शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

चौकीदाराअभावी रोपवन वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया आरमोरी बिटातील सर्व्हे क्रमांक १०२३ मधील पर्यायी रोपवनात एकही चौकीदार राहत नसल्याने रोपवनातून निर्माण झालेल्या शिवणच्या इमारती फाट्यांची मोठ्या प्रमाणात अवैध तोड करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आरमोरी बिटात २००९ साली १०२.६२ हेक्टर ...

ठळक मुद्देआरमोरी बिटमधील स्थिती : नेमलेले चौकीदार वन अधिकाऱ्यांच्या सेवेत

लोकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाºया आरमोरी बिटातील सर्व्हे क्रमांक १०२३ मधील पर्यायी रोपवनात एकही चौकीदार राहत नसल्याने रोपवनातून निर्माण झालेल्या शिवणच्या इमारती फाट्यांची मोठ्या प्रमाणात अवैध तोड करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाºयांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आरमोरी बिटात २००९ साली १०२.६२ हेक्टर जागेवर वन विभागाने ४१ हजार शिवण व मिश्र रोपांची लागवड केली आहे. प्रत्येकी २५ हेक्टरवरील रोपवनाचे संरक्षण करण्यासाठी एक रोपवन चौकीदार या प्रमाणे पाच वर्षांकरिता चार चौकीदारांची नेमणूक करायचे होते. मात्र केवळ दोनच चौकीदार नेमण्यात आले. पाच वर्षांचा कालावधी २०१४ मध्ये संपल्यानंतर पुन्हा पुढील पाच वर्षांकरिता चार चौकीदारांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी एकही चौकीदार राहत नाही. एक चौकीदार क्षेत्र सहाय्यक यांच्या खोलीवर जेवन तयार करणे व अधिकाºयांची खासगी कामे करण्यात गुंतवून ठेवण्यात आला आहे. दुसरा चौकीदार आरमोरी उद्यानात येणाºया अधिकाºयांची सेवा करीत आहे. तिसºया चौकीदाराला आरमोरी कक्ष क्रमांक ४२ च्या रोपवनात नेमणूक दिली आहे. मात्र तो जास्तीत जास्त आरमोरी शहरातच आढळत असल्याने त्याच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह आहे. चवथा चौकीदार वनपरिक्षेत्र कार्यालयातील फाईल या टेबलवरून त्या टेबलवर नेण्याचे काम करीत आहे. त्याच बरोबर वन अधिकाºयांचा चहा बनविण्याचेही काम त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे.रोवनाच्या लागवडीसाठी आजपर्यंत कोट्यवधी रूपये शासनाचे खर्च झाले आहेत. शिवणची झाडे आता ४० ते ५० सेमी गोलाईची झाली आहेत. दुसरीकडे या ठिकाणी एकही चौकीदार कार्यरत नाही. त्यामुळे झाडे तोडून विकणारी टोळी सक्रीय झाली आहे. चौकीदारांना वेतन एका योजनेतून तर काम दुसरेच देण्याची जुनी हूकुमशाही वृत्ती येथील वनअधिकाºयांनी कायम ठेवली असल्याचे दिसून येते. काही दिवस रवी जंगल परिसरात वाघाचे साम्राज्य होते. त्यामुळे जंगलात कुनीही येत नाही. असा गैरसमज वनविभाच्या अधिकाºयांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र वस्तूस्थीती वेगळी असल्याचे दिसून येते. हिवाळ्यात आता घर बांधणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिक जंगलात जावून रोपवनातील झाडांची तोड करीत आहेत. लाकडाचे फाटे विकणारी टोळी सक्रिय झाली आहे.दिवसेंदिवस जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याबरोबरच जंगलाचे संरक्षण करण्यासाठी शासन वनविभागावर कोट्यवधी रूपयांचा खर्च करीत आहेत. मात्र वनविभाचे अधिकारी शासनाच्या निधीची अशी परस्पर वाट लावत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. चौकीदारांचे अवैध हस्तांतरण करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.झाडे तोडलेल्या खुटांची मोजणी कराचार महिन्यांपूर्वी आरमोरी तालुक्यातील रवी गावाच्या जंगल परिसरात वाघाने दहशत निर्माण केली होती. दोन नागरिकांचा जीव वाघाने घेतला होता. दर दिवशी वाघाचे दर्शन घडत असल्याने नागरिक भयभयीत झाले झाले होते. नरभक्षक वाघाला पकडल्यानंतर वाघाची दहशत संपली आहे. मात्र वनविभागाच्या अधिकाºयांवर वाघाच्या दहशतीचे भूत अजूनही कायम आहे. वाघाच्या भीतीमुळे नागरिक रोपनात शिरणार नाही, असा चुकीचा समज करण्यात आला आहे. मात्र रोपवनात शिरून झाडांची तोड करण्यात येत आहे. तोड करण्यात आलेल्या खुटांची मोजणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.सर्व्हे क्रमांक १०२३ मधील १०२.६२ हेक्टर आर वरील रोपवनाच्या संरक्षणारकरिता चौकीदार नियुक्त केलेले आहेत. मात्र अधिकाºयांच्या आदेशानुसार रोपनाच्या संरक्षणासाठी कधी चौकीदार राहतात कधी अधिकाºयांनी सांगितलेल्या कामावर निघून जातात. वाघाच्या गस्तीचेही काम करतात. प्रत्येक काम नियमाप्रमाणे करणे अवघड आहे.- के. बी. उसेंडी,क्षेत्र सहायक, आरमोरी