शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

सीईओंच्या भूमिकेमुळे प्रशासकीय कामात येत आहे गतिमानता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2021 05:00 IST

गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले हाेते. यावेळी मंचावर जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर आदी उपस्थित हाेते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जिल्हा परिषदेअंतर्गत बरेच लिपिकवर्गीय कर्मचारी मागील काही कालावधीत सरळसेवेने, अनुकंपा तत्त्वावर तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून नव्याने नियुक्त झाले. दोन वर्ष हे कोराना संसर्गात गेल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता आले नाही. परंतु जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी तातडीने निकाली काढण्यास व प्रलंबित मागण्यांसाठी घेतलेला पुढाकार यामुळे प्रशासकीय कामात गतिमानता येत आहे, असे गौरवोद्गार जि. प. कर्मचारी महासंघ आणि लिपिकवर्गीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढले.गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबूराव शेडमाके सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची सभा व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले हाेते. यावेळी मंचावर जि. प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रतन शेंडे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर आदी उपस्थित हाेते. उमेशचंद्र चिलबुले यांनी शासनाकडून सुरू असलेले कर्मचारी विरोधी धोरण, नवनवीन कामगार कायदे यामुळे कर्मचाऱ्यांवर फौजदारी प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे, असे सांगितले. रतन शेंडे यांनी २९ ऑक्टोबर रोजीच्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, तसेच संघटनेच्या कामात हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. संघटनेचे काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये वकृत्वशैली, बुद्धिमत्ता व संघटनक्षमता असणे आवश्यक आहे. संघटनेच्या प्रत्येक वाटचालीत सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे सरचिटणीस फिरोज लांजेवार यांनी केले.प्रास्ताविक धनंजय दुमेट्टीवार, संचालन सारंग गायकवाड यांनी केले तर आभार माया बाळराजे यांनी मानले. यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

लिपिकवर्गीय संघटनेची मुख्यालय शाखा गठितयावेळी लिपिकवर्गीय संघटनेची मुख्यालय शाखा गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून धनंजय दुम्पेट्टीवार यांची फेरनिवड करण्यात आली. सचिव म्हणून गिरीश बुद्धावार, कार्याध्यक्ष योगेश वैद्य, उपाध्यक्ष सुनीता घाईत (रामटेके), कोषाध्यक्ष सचिन मांडवगडे यांची निवड करण्यात आली. तसेच विभागप्रमुख म्हणून डंबाजी मेश्राम, राजू हेमके, सुरेश कांबळे, परशुराम गानफाडे, मथूर क्रिष्णापूरकर, रितू नरोटे, कुनघाडकर, योगिता दोनाडकर, सुनीता धाईत, दिलीप सोनटक्के, सुनीता दहीकर, नयना कुमरे, प्रसिद्धीप्रमुख आशिष मोटर व रूपेश आत्राम यांची निवड केली.

यांचा झाला सत्कार प्रशासकीय मार्गदर्शन संपल्यानंतर सभेमध्ये जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दुधराम रोहणकर, सरचिटणीस फिरोज लांजेवार, कार्याध्यक्ष उमेशकुमार लोहकरे, कोषाध्यक्ष अखिल श्रीरामवार, सहकोषाध्यक्ष गणेश सुंकरवार, उपाध्यक्ष रितेश वनमाळी, महिला उपाध्यक्ष गिता कुतीरकर, सहसचिव स्वप्निल पुलके, मानद सचिव अविनाश सिडाम, मुस्ताक शेख सल्लागार एस. यू. सांडे, कमलेश मेश्राम, महिला प्रतिनिधी सुनीता आत्राम, सुनीता घाईत, माया बाळराजे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद