बाजूने नाली नसल्यामुळे पाणी जाण्यासाठी आडवा सिमेंट पाइप टाकण्यात आला आहे. हा पाइप अतिशय लहान आहे. ज्या ठिकाणी पाइप टाकण्यात आला आहे त्या ठिकाणी मोठा खडा झाल्यामुळे पावसाचे पाणी भरून दुर्घटना घडू शकते. काही भागात नालीवर स्लॅब टाकण्यात आले नाही. हे काम तसेच ठेवून दुसऱ्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. आठ दिवसांत फक्त दहा ते पंधरा फूट रस्त्याचे काम झाले. त्यानंतर काम बंद ठेवण्यात आले आहे. रस्त्यावर पाणी टाकले जात नाही, याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. काम अर्धवट असल्याने नागरिकांना रहदारीसाठी रस्ता अडचणींचा ठरत आहे. अभियंता व नगरसेवक यांना याविषयीची तक्रार करण्यात आली आहे. मात्र नगर परिषदेचेही दुर्लक्ष हाेत आहे.
शिवाजी वाॅर्डातील रस्त्याचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST