शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

बीआरओअभावी रस्त्यांची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:04 PM

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२० वर्षे होते कार्यरत : कोट्यवधींची यंत्रसामुग्री धूळखात; परत काम देण्याची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात रस्ते, पूल बनविण्यात अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या बीआरओ (बॉर्डर रोड आॅर्गनायझेशन) तुकडीचे स्थानांतरण करण्यात आले आहे. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्ते निर्मितीचे काम ठप्प पडले आहे. एमआयडीसी परिसरात असलेली बीआरओची निवासस्थाने ओसाड पडली असून जेसीबी, ट्रक व इतर साहित्य अशी कोट्यवधी रूपयांची मालमत्ता धूळखात पडून आहे.जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव आहे. नक्षल्यांचा रस्ते, पूल व इतर विकास कामांना विरोध असल्याने ही विकास कामे करणाºया कंत्राटदाराचे साहित्य जाळत होते. परिणामी कंत्राटदार जिल्ह्यात काम करण्यास तयार नव्हते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, सिरोंचा, कोरची, अहेरी या तालुक्यातील जंगलव्याप्त गावांना रस्ते नव्हते. शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी बांधकाम करणारी यंत्रणा नसल्याने सदर निधी परत जात होता.दुर्गम भागात रस्ते तयार केल्यास दळणवळण वाढून या भागाचा विकास होईल, त्याचबरोबर नक्षल्यांच्या हालचालीवरही नियंत्रण ठेवता येईल, या उद्देशाने शासनाने गडचिरोली जिल्ह्यात बीआरओची तुकडी १९९२ मध्ये पाठविले. या तुकडीचे मुख्यालय कोटगलजवळ एमआयडीसी परिसरात उभारून जिल्हाभरात रस्ते व पूल बांधकामाला सुरुवात केली. अनेक दुर्गम गावांपर्यंत मार्ग पोहोचविण्यात बीआरओने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बीआरओने बांधलेले रस्ते, पूल आजही शाबूत आहेत. रस्ते व पूल झाल्याने दुर्गम भागाच्या विकासाला चालना मिळून नक्षल चळवळीलाही हादरा बसला होता. मात्र अचानक शासनाने २०१३ मध्ये बीआरओचे स्थानांतरण अरूणाचल प्रदेशात केले. तेव्हापासून दुर्गम भागातील रस्त्यांचे काम ठप्प पडले आहे. बीआरओच्या तुकडीला पुन्हा बोलवावे, अशी मागणी आहे.‘ते’ रस्ते व पूल अजूनही सुस्थितीतबीआरओ हा केंद्र शासनाचा विभाग आहे. बीआरओने केलेली सर्वच कामे दर्जात्मक होती. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधलेली कामे अजूनही सुस्थितीत आहेत. बीआरओचे स्थानांतरण झाल्यानंतर विकास कामे ठप्प पडली आहेत. सद्य:स्थितीत काही कामे कंत्राटदारांच्या मार्फत केली जात आहेत. मात्र या कामांचा दर्जा सुमार असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. काही ठिकाणी तर बांधकाम न करताच कंत्राटदार पैसे उचलून मोकळे होत आहेत. याचा काही वाटा शासकीय अधिकाºयांनाही मिळत आहे. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भाग असल्याने या भागात वरिष्ठ अधिकारी पोहोचत नाही. याचा दुरूपयोग आता कंत्राटदार व अधिकारी घेत आहेत.बीआरओ नक्षल्यांवर भारीनावावरूनच बीआरओ हा विभाग अतिशय कठीण ठिकाणी रस्ते बांधण्याचे काम करते. या विभागाकडे रस्ते व पूल बांधणारे सर्व तंत्रज्ञ, यंत्रसामुग्री तसेच संरक्षण यंत्रणा उपलब्ध आहे. बीआरओची ताकद नक्षल्यांवरही भारी पडत होती. परिणामी नक्षल्यांचे गड समजल्या जाणाºया गावांमध्ये बीआरओने पूल व रस्त्यांचे बांधकाम करूनही एक-दोन घटना वगळता नक्षल्यांनी कोणतीही विपरित घटना केली नाही. यावरून बीआरओ हे नक्षल्यांवर भारी पडले होते, असे दिसून येते.