शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

नक्षलींचा खात्मा करणाऱ्या पोलिसांना बक्षीस, पालकमंत्र्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 08:24 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही : सी ६० कमांडोंचे केले अभिनंदन

ठळक मुद्देसुरजागढ येथे सुरु केलेल्या लोहखनिज प्रकल्पामुळे पाच हजार स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोलीचा चेहरामोहराच बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.

ठाणे : गडचिरोलीतील नक्षली चकमकीत सहभागी झालेल्या पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांना बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती गडचिरोली तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली. गेल्या काही वर्षामध्ये गडचिरोलीच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली असून हा जिल्हा नक्षलवाद्यांच्या प्रभावापासून दूर जाऊन विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे मार्गक्रमण करीत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी दहा कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्तीसगढच्या सीमेवरील गडचिरोलीमध्ये झालेली चकमक सुमारे दहा तास सुरू होती. या कारवाईची सर्वच राज्यांनी दखल घेतली आहे. या चकमकीत माओवादी संघटनेच्या सेंट्रल झोन कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २६ नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. गेल्या काही दिवसांमधील नक्षलविरोधी कारवायांमधील ही एक मोठी  कारवाई आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सी ६० कमांडोंचे या वेळी शिंदे यांनी अभिनंदन केले. चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली. 

सुरजागढ येथे सुरु केलेल्या लोहखनिज प्रकल्पामुळे पाच हजार स्थानिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. त्यामुळे गडचिरोलीचा चेहरामोहराच बदलून टाकण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना पक्की घरे तसेच जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना आपले आयुष्य नव्याने सुरु करण्याची संधी दिली जाते. नक्षलविरोधी कारवायांमध्ये जखमी जवानांवर तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा आहे. दुर्गम भागातील गस्तीसाठी जिल्हा नियोजन निधीतून पोलिसांना २३ मोटारी दिल्या आहेत. 

पोषणमूल्यवर्धित उत्पादनास प्रोत्साहनमोहफुलावरील निर्बंध उठवून मोहफुलांचे पौष्टिक लाडू तसेच इतर पोषणमूल्यवर्धित उत्पादनास प्रोत्साहन दिले. कोरची येथील जांभळांना नागपूरच्या बाजारपेठेत पाठविण्याची सोय उपलब्ध करून २० रुपयांऐवजी ११० किलोचा विक्रमी भाव मिळवून दिला. नफा देणारी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्याचेही शिंदे या वेळी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी