लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे. अव्वल कारकून अतिरिक्त होऊन त्यांना पदावनत व्हावे लागणार आहे. त्यामुळे पदभरतीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातील कर्मचाºयांनी १० आॅक्टोबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाºयांच्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता.महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहायक असे करण्याचे मान्य केले होते. त्याबाबतचा शासन निर्णय काढावा, नायब तहसीलदार पदाचा ग्रेड-पे ४३०० वरून ४८०० रूपये करण्याचे मान्य केले होते. मात्र त्याचाही शासन निर्णय निघाला नाही. अव्वल कारकून या संवर्गाची वेतनश्रेणीमधील त्रूटी भरून काढावी, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्याबाबत शासनाने मान्य केले असून त्याबाबतचा निर्णय घेणे, पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील पद पदोन्नतीचे असल्यामुळे सरळसेवेने न भरणे, नायब तहसीलदारांचे सरळसेवा भरतीचे पदे प्रमाण ३३ टक्केवरून २० टक्के करणे व पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करणे याबाबत शासन निर्णय पारित करणे, आकृतिबंधात सुधारणा करण्याबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपीक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार व इतर पदे वाढविले आहेत. यामध्ये कोणतीही कपात न करता त्वरित मंजुरी देऊन शासन निर्णय पारित करणे, संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणूक, पुरवठा व महसूलेत्तर इतर कामांसाठी नव्याने आकृतीबंध तयार करून त्वरित सादर करून मंजुरी आदेश निर्गमित करणे आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. सुरुवातीला पुरवठा विभागातील महसूल कर्मचाºयांनी ३ आॅक्टोबरपासून आंदोलन सुरु केले आहे. मात्र शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील सर्व महसूल व पदोन्नत नायब तहसीलदारांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्टÑ राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, कार्याध्यक्ष व्ही.सी. येरमे, संघटक अल्पेश बारापात्रे, कार्यकारिणी सदस्य ललीत लाडे, सल्लागार सुनील चडगुलवार, धीरज चौधरी, महिला प्रतिनिधी कविता नायडू यांनी केले.तहसील कार्यालयांमधील कामकाज ठप्पतहसील कार्यालयात ८० टक्के कर्मचारी महसूल विभागाचे आहेत. यातील पदोन्नत नायब तहसीलदार ते शिपाई पदापर्यंतच्या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन पुकारले. मंडप टाकून तहसील कार्यालयाच्या बाहेर कर्मचारी बसले असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत होता. बाहेर बसलेले कर्मचारी बघून प्रशासकीय कामासाठी आलेले शेतकरी व सामान्य नागरिक आल्यापावली परत जात होते. चावडी वाचनानंतर आता तहसीलस्तरावरील समिती कर्जमाफीच्या अर्जांची छाननी करीत आहे. मात्र महसूल विभागाचे कर्मचारी नसल्याने छाननी कामातही अडथळा निर्माण झाला होता.
महसूल विभागाचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:22 IST
पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक हे पद सरळसेवा भरतीने भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागातील अव्वल कारकून दर्जाच्या कर्मचाºयांवर अन्याय होणार आहे.
महसूल विभागाचे कामकाज ठप्प
ठळक मुद्देकर्मचारी संघटनेचा बेमुदत संप : जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांमध्ये शुकशुकाट