शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासन दुर्गम भागात पोहोचले

By admin | Updated: March 16, 2017 01:20 IST

तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पुरसलगोंदी गावात तालुका मुख्यालयातील महसूल विभागाचे अधिकारी

पुरसलगोंदीत ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रम : स्टॉलद्वारे शासकीय योजनांची माहिती एटापल्ली : तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील पुरसलगोंदी गावात तालुका मुख्यालयातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी थेट पोहोचून नागरिकांना योजनांची माहिती दिली. निमित्त होते महसूल विभागामार्फत महाराजस्व अभियानांतर्गत शुक्रवारी समाधान शिबिर पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार एस. पी. खलाटे, नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, मंडळ अधिकारी बी. एम. गुरू, पुरसलगोंदीच्या सरपंच कल्पना आलाम, शाळेचे मुख्याध्यापक ए. एस. झोडे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. इटनकर म्हणाले, महिला बचतगटांना नवीन उपक्रम राबविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, या भागातील नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी आदिवासी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी आरोग्य, कृषी आदिवासी विकास विभाग तसेच पंचायत समितीमार्फत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून संबंधित विभागाच्या शासकीय योजनांची जनजागृती केली. या शिबिरात योजनांच्या लाभाचे अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी एस. एम. सोमनकर, संचालन ए. एन. शेंडे यांनी केले तर आभार व्ही. आर. टपाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी) विविध प्रकारच्या ३७५ दाखल्यांचे वाटप सदर समाधान शिबिरात महसूल प्रशासनामार्फत ८४ नागरिकांना रहिवासी दाखले, ५९ उत्पन्नाचे दाखले, गृह चौकशी अहवाल ६८, सातबारा ४८, गाव नमूना आठ अ ४८, नातेवाईकांचे प्रमाणपत्र ६८ असे एकूण ३७५ दाखल्यांचे नागरिकांना वाटप करण्यात आले. तसेच १४ नागरिकांना शिधापत्रिकेची दुय्यम प्रत देण्यात आली. एकूण ४७ जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव शिबिरस्थळी महसूल कर्मचाऱ्यांनीच तयार केले.