शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वर्षभरात १६ कोटींचा महसूल

By admin | Updated: April 16, 2017 00:32 IST

राज्य सरकारने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या करामधून एकूण ११ कोटी ८९ लाख रूपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते.

आरटीओ विभाग मालामाल : उद्दिष्टांपेक्षा अधिक कर वसूलदिलीप दहेलकर गडचिरोलीराज्य सरकारने गडचिरोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सर्व प्रकारच्या करामधून एकूण ११ कोटी ८९ लाख रूपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र गडचिरोलीच्या आरटीओ कार्यालयाने उद्दिष्टापेक्षा अधिक कर वसुली करीत तब्बल १६ कोटी ६७ लाख ४७ हजार रूपयांचा महसूल वर्षभरात मिळविला आहे. मिळालेल्या महसुलाची टक्केवारी १४०.२० आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला नव्या वाहनांची नोंदणी, नुतनीकरण, मोटर वाहन कर तसेच वाहनांचे तडजोड शुल्क तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनावर आकारलेला दंड तसेच विना परवाना वाहनावर दंडात्मक कारवाई आदीसह तत्सम बाबीतून महसूल मिळत असतो. आरटीओ कार्यालयाला आयएमव्ही शुल्कातून एकूण ३१४.५२ लाख, बीएमव्ही शुल्कापोटी १३३०.३४ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. आरटीओ कार्यालयाला सर्व प्रकारचे कर मिळून फेब्रुवारी २०१७ अखेर १४३०.६७ लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दुचाकी व चारचाकी वाहन परवाना काढण्यासाठी संबंधित उमेदवारांकडून शुल्क आकारले जाते. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार, पाच वर्षांपासून नव्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे परवाना, नोंदणी व इतर शुल्काच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाचा महसूलही वाढत आहे. क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या चालकांकडून ५० लाखांचा दंड वसूलक्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने कारवाई केली जाते. सन २०१६-१७ या वर्षात आरटीओ कार्यालयामार्फत क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या एकूण ९४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २४० वाहने दोषी आढळून आली आहे. २१२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच वर्षभरात २४० वाहने जप्त करण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या २१२ प्रकरणातून आरटीओ कार्यालयाने ५० लाख २४ हजार १६३ रूपयांची दंडात्मक वसुली केली आहे. यामध्ये ३२ लाख ५६ हजार २०० रूपये तडजोड शुल्क व १७ लाख ६७ हजार ९६३ रूपयांच्या विभागीय कारवाई अंतर्गत तडजोड शुल्काचा समावेश आहे. ध्वनी प्रदूषण तपासणीतून साडेआठ लाखधावत्या वाहनाच्या धुरामुळे ध्वनी प्रदुषण होऊन याचा परिणाम माणसाच्या प्रकृतीवर होतो. त्यामुळे अधिक प्रदुषण करणाऱ्या वाहनावर आरटीओ कार्यालयामार्फत कार्यवाही केली जात आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३ हजार २८२ वाहनांची ध्वनी प्रदुषण तपासणी करण्यात आली. यामध्ये १ हजार २६ वाहने दोषी आढळून आली. या संदर्भात ९१९ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून या माध्यमातून ८ लाख ५२ हजार रूपयांच्या तडजोड शुल्काची वसुली करण्यात आली.वायूवेग पथकाकडून १७२.७२ लाख वसूलअवैध प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या तसेच विना परवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी आरटीओ कार्यालयाच्या वायू वेग पथकाद्वारे केली जाते. वायू वेग पथकाला शासनाने सन २०१६-१७ या वर्षात ८४.९६ लाख रूपयांचा उद्दिष्ट दिले होते. वायूवेग पथकाने उद्दिष्टापेक्षा अधिक कारवाई करीत १७२.७२ लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला आहे. यामध्ये गृहराज्यातून ७२.८१ लाख व इतर राज्यातून ९९.९१ लाख रूपये महसूलाचा समावेश आहे. अवैध प्रवासी वाहतुकीतूनही वसुलीउपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या वतीने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकूण ५१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार वाहनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक आढळून आली. दोषी आढळलेल्या तीन वाहन चालकांकडून ६८ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.