शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

तेलंगणातून वनाधिकारी व चमू रिकामीच परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:53 IST

आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर कासरगट्टा फाट्याजवळ कापसातून १२ सागवानी लठ्ठे तेलंगणा राज्यात नेण्याच्या प्रकरणी अहेरी...

कापसातून सागवान तस्करीचे प्रकरण : करीमनगर येथे गेले होतेआलापल्ली : आलापल्ली-चंद्रपूर मार्गावर कासरगट्टा फाट्याजवळ कापसातून १२ सागवानी लठ्ठे तेलंगणा राज्यात नेण्याच्या प्रकरणी अहेरी वन विभागाची चमू करीमनगर येथे आरोपीला पकडण्यासाठी गेली होती. मात्र पूर्व नियोजन न केल्याने चमूला रिकाम्या हाताने परत यावे लागल्याचा प्रकार घडला आहे.आलापल्ली येथून अहेरी वन परिक्षेत्राधिकाऱ्याची एक चमू आलापल्लीच्या उपविभागीय वनाधिकाऱ्याच्या नेतृत्वात गेली होती. या चमूत एक वन परिक्षेत्राधिकारी व काही वन कर्मचारी होते. ते मुख्य आरोपी विजयकुमार जीवनलाल केला तसेच सहआरोपी किशोर सतिश जयस्वाल याला घेऊन कबीर मोहम्मद खलील रा. कागजनगर याला अटक करण्यासाठी गेले असता, सोबत एक उच्चस्तरीय वनाधिकारी असून परप्रांतात तपासासाठी जाण्याआधी त्यांनी तेथील वन विभाग किंवा पोलिसांना न कळविता परस्पर कबीर यांच्या पत्यावर पोहोचले. कागजनगरला ही चमू गेली तेव्हा सायंकाळचे ७ वाजले होते. वनाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी सुरू केल्यावर तेथे खूप मोठा जमाव जमा झाला. त्याची माहित खलील मिळाली व तो वन विभागाची चमू त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याच्या आतच पळून गेला. वास्तविक परप्रांतात आरोपी अटक करण्यासाठी जाताना तेथील आपल्या विभागाच्या किंवा पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक होते. परंतु फिल्मी स्टाईलने त्याच्या घरापर्यंत गेलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावे लागले, अशी माहिती एका वन कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला दिली. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने आरोपीला पकडण्यासाठी काम केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती. तेलंगणातच त्याला जेरबंद करून येथे आणता आले असते. परंतु नियोजनाचा अभाव, पथकातील कर्मचाऱ्यांची वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीला विरोध न करण्याची भूमिका नडली, अशी चर्चा वन विभागात आहे. (वार्ताहर)तस्करीच्या तपासाचे प्रकरण सिरोंचा वन विभागाकडे हस्तांतरित होणारआलापल्ली : आलापल्ली वन विभागातील अहेरी वन परिक्षेत्रामधील अवैध लाकूड तस्करी संबंधातील तपास सिरोंचा वन विभागास हस्तांतरीत करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहे. हे प्रकरण सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.कापसाच्या गाडीतून अवैध पध्दतीने सागवान तस्करी करताना वन विभागाने चार आरोपींना अटक केली होती. त्या चार जणांची सुरूवातीला वन कोठडीत वन विभागाने चौकशी केली. या चौकशीतून सदर सागवान अवैधरित्या नंदीगाव येथून खरेदी केले, अशी माहिती मिळाली. नंदीगाव येथील एकूण ६ पैकी दोन आरोपींना अटक करण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले. यामध्ये आनंद मोडी सिडाम (२६) रा. नंदीगाव व वनिश येर्रा आलाम (५०) यांचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपी फरार आहेत. सदर अवैध सागवनाची कटाई (मुद्देमाल) हा सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन विभागातील असून आलापल्ली वन विभागांतर्गत येत असलेल्या अहेरी वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पकडला असल्यामुळे अधिक तपासासाठी सदर प्रकरण हे आता आलापल्ली वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे सिरोंचा वन विभागाच्या रेपनपल्ली वन परिक्षेत्राधिकाऱ्यांकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.