शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला चिंतन करायला लावणारा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:26 IST

विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा मतदार संघात भाजपचे डॉ.रामदास आंबटकर अवघ्या ३७ मतांनी विजयी झाले. वास्तविक पक्षीय मतदारांच्या संख्याबळाचा विचार केला तर ही निवडणूक त्यांनी एवढ्या कमी फरकाने जिंकणे अपेक्षित नव्हते. पण तसे झाले नाही आणि भाजपला निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अनपेक्षितपणे काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांनी तब्बल ४९१ मते घेऊन भाजपला आश्चर्याचा धक्का दिला. विधान परिषदेसारख्या घोडेबाजारावर चालणाऱ्या निवडणुकीत असे धक्के बसणे नवीन नाही. पण अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वाढलेले हे मताधिक्य भाजपला चिंतन करायला लावणारे आहे.राजकारणात कायमसाठी कोणीही कोणाचे नसते असे म्हटले जाते. अर्थात या वाक्याचा अर्थ एखाद्या पक्षाचे ध्येयधोरण पटले नाही तर दुसºया पक्षाच्या तंबूत जाऊन बसणे असा असू शकतो. राजकीय सोयीसाठी अशी पक्षांची अदलाबदली करणे नवीन नाही. पण नितीमत्ता, धोरण वगैरे बासनात गुंडाळून राजकीय पक्षांचे पदाधिकारी जर केवळ आर्थिक लाभासाठी एखाद्या पक्षाला मदत करीत असेल तर ही बाब त्या पक्षासाठी निश्चितच चिंताजनक आहे. विशेषत: भाजपसारख्या नैतिकतेवर, विचारधारेवर आपला पक्ष चालतो असा दावा करणाºया पक्षाचेही हक्काचे मतदार जेव्हा त्यांना धोका देतात, तेव्हा भविष्यातील गडबडीची ती चाहुल आहे असे मानण्यास हरकत नाही.या निवडणुकीत भाजपचे हक्काचे मतदार ५०७ असले तरी भाजपला ५२८ मते मिळाली. म्हणजे इतर पक्षाच्या आणि अपक्ष उमेदवारांनी भाजपला मदत केली हे निश्चित. पण भाजपची पूर्णपैकी पूर्ण मते भाजपला मिळाली नाही हेही तितकेच खरे आहे. दुसरीकडे काँग्रेसकडे आपल्या हक्काची २७२ आणि राष्टÑवादी काँग्रेसची ९० मते मिळून ३६२ मते होती. पण शिवसेना, बसपा, भारिप यांच्यासह अपक्षांनी मदत केल्यामुळेच काँग्रेसच्या पारड्यात ४९१ मते पडू शकली. घोडेबाजारात मतांची घेवाण-देवाण होत असली तरी सत्ताधारी भाजपच्या उमेदवाला सोडून काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजुने उभे झालेले हे सर्वपक्षीय मतदार भविष्यात भाजपसाठी ‘खतरे की घंटी’ ठरू शकतात. भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेची फळे चाखणाºया शिवसेनेनेही काँग्रेसला साथ दिली. एवढेच काय, ८४ अपक्षांपैकी मोजक्याच लोकांची भाजपला साथ मिळू शकली. या निवडणुकीत काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ हे जरी नवखे उमेदवार असले तरी त्यांच्या मागे उभे असणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मतांचे हे गणित जुळवून आणण्यात महत्वाची भूमिका बजावून आपली अजूनही पकड असल्याचे दाखवून दिले.या निवडणुकीत निसटता का होईल, भाजपला विजय मिळाला हे मात्र खरे आहे. त्यामुळे े‘जो जिता वही सिकंदर’ याप्रमाणे डॉ.आंबटकर सिकंदर ठरले आहे. आता त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे या जिल्ह्याच्या गरजांचा अभ्यास करून त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. विशेषत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासारख्या महत्वाच्या विषयाला त्यांनी हात घालून ते मंजूर करून आणल्यास जिल्ह्याच्या विकासातील तो एक मैलाचा दगड ठरेल. संघनिष्ठ म्हणून त्यांची गडकरी, फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्यांशी जवळीकता आहे. त्याचा फायदा घेत आंबटकर अनेक कामे या जिल्ह्यासाठी खेचून आणतील अशी अपेक्षा ठेवुया.

टॅग्स :BJPभाजपा