ऑनलाईन लोकमतआरमोरी : आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेंतर्गत तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम १७ मार्च रोजी आरमोरीत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनिता सहाकाटे होत्या. पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांनी आरोग्य विभागातील प्रश्न हे जिल्हा व राज्य स्तरीय असल्यामुळे त्या विषयी समाधान करण्यासाठी आमदार किंवा पालक मंत्री यांचेशी संवाद व्हावा अशी आशा व्यक्त केली. तालुक्यात आरोग्य विषयक खूप अडचणी आहेत. उपकेंद्र सुकाळा येथे लाल पाणी येत असल्यामुळे पिण्यायोग्य नाही म्हणून विहीर मंजूर झाली आहे. भाकरोंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लाल पाणी येते म्हणून ग्रामपंचायत मधून नळ घेतले आहेत. उपकेंद्र शिवनी व सायगाव येथील निर्लेखनचा प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठविला आहे, असे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.आरमोरी तालुक्यात मागील पाच वर्षात एकही माता मृत्यू झालेला नाही यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांच्या प्रयत्नामुळे माता मृत्यू झालेले नाहीत. तालुका जनसंवाद कार्यक्रमात जि. प. सदस्य वनिता सहाकाटे, पं. स. सभापती बबिता उसेंडी, उपसभापती यशवंत सुरपाम पं. स. सदस्य विवेक खेवले, वृदा गजभिये, निता ढोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रमोद गवई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद ठिकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ विलास वाघधरे, डॉ रचना नागदेवे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागेश ठोबरे, आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख नियोजन प्रक्रिया जिल्हा समन्वयक शुभदा देशमुख उपस्थित होत्या. संचालन माया कोचे यांनी केले आभार नूतन लाऊतकर यांनी मानले. विजयालक्ष्मी वघारे, वामन पाटणकर, सुशील भनारे, प्रेमदास राऊत पुष्पलता तिरपुडे, माया कोचे, यशवंत देशमुख, राहुल लोहबरे यांनी सहकार्य केले.
डॉक्टरांअभावी केंद्रांच्या सेवेवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:29 IST
आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रियेंतर्गत तालुका स्तरीय जनसंवाद कार्यक्रम १७ मार्च रोजी आरमोरीत येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
डॉक्टरांअभावी केंद्रांच्या सेवेवर परिणाम
ठळक मुद्देआरमोरीत तालुकास्तरीय जनसंवाद : प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्यांवर चर्चा