मात्र, काेराेनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नागपुरात बरीच निर्बंध घालण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर शहरात जाणाऱ्या बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी उमरेडपासूनच तपासणी केली जाते. केवळ २२ प्रवासी असल्यास डिझेलचाही खर्च भरून निघणे कठीण हाेत आहे. नागपुरातून येणाऱ्या बसेसमध्येही अर्धेच प्रवासी बसविले जात आहेत.
बाॅक्स
महिन्याला लागते दीड काेटींचे डिझेल
एसटीचा सर्वाधिक खर्च डिझेलवर हाेतो. गडचिराेली आगारात एकूण १०३ बसेस आहेत. या बसेस जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक करतात. एक दिवसाआड गडचिराेली आगारात १२ हजार लिटर क्षमतेचे एक टॅँकर बाेलाविले जाते. एका टँकरची किंमत १० लाख १० हजार रुपये आहे. असे एका महिन्याला जवळपास दीड काेटी रुपयांचे डिझेल लागते.
लाॅकडाऊनपासून एसटीच्या उत्पन्नावर माेठा विपरीत परिणाम झाला आहे. लाॅकडाऊनपूर्वी दरदिवशीचे उत्पन्न ९.५ लाख रुपये हाेते. आता हे उत्पन्न ६.५ लाखांवर पाेहाेचले आहे. कधी कधी डिझेल खरेदी करण्यासाठीही पैसे राहत नाही. त्यामुळे बसेस साेडण्यास उशीर हाेतो.