शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवू

By admin | Updated: December 24, 2014 23:00 IST

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अल्पश: मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाताहत होत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अल्पश: मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वाताहत होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रश्न त्वरित सोडविण्यात यावे, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी महासंघाच्यावतीने महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकुर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. महिला व बालकल्याण राज्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, व्हीसीडीसी योजना बंद करण्यात यावी, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्या, वैद्यकीय रजा, देण्यात यावी, आरोग्य व पाणीपुरवठा योजनेचा निधी संयुक्त खात्यात न देता तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यात देऊन व्यवहाराचे अधिकार देण्यात यावे, अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक, सामाजिक त्रास देणाऱ्या काही संस्थांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पद भरतांना अनुभव असलेल्या व पात्र अंगणवाडी सेविकांमधूनच पदोन्नती करण्यात यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार देऊ नये, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या इतर कामाचेही बंधन ठेवू नये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारकालीन दीर्घ रजा तसेच इतर सोयी- सुविधा देण्यात याव्या, प्रवासभत्ता त्वरित मंजुर करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात डॉ. देवराव होळी, नंदू नरोटे, अंगणवाडी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पुराम उपस्थित होते.