शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

चार गावांत दारूमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 01:23 IST

लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.

ठळक मुद्देमुक्तिपथ अभियान : निवडणूक प्रक्रियेदरम्यान घेणार विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी मुक्तिपथद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भामरागड तालुक्यातील जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मंगळवारी मुक्तिपथ गाव संघटनांची बैठक घेऊन ही निवडणूक दारूमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. ही दारूबंदी टिकून राहावी आणि दारूची विक्री करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुक्तिपथ उपक्रमाद्वारे व्यापक प्रयत्न केले जात आहे. यांतर्गत अनेक गावांनी दारूविक्रीबंदीचे ठराव घेऊन गावातील दारूविक्री टिकवून ठेवली आहे. पण निवडणूक काळात मतदारांना दारूचे आमिष दाखवून मते आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा प्रयत्न काही उमेदवार करीत असतात. अशा उमेदवारांच्या आमिषाला बळी न पडता ही निवडणूक दारूमुक्त करण्यासाठी काय करता येईल यासाठी तालुका मुक्तिपथ चमुद्वारे जिंजगाव, मरपल्ली, चिचोडा व इरकडुम्मे या गावांमध्ये मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी ही निवडणूक दारूमुक्त निवडणूक असा निर्धार करण्याचे आवाहन गावकऱ्यांना करण्यात आले. त्याचबरोबर मतदान करणे हा प्रत्येकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे. त्यामुळे तो प्रत्येकाने पूर्ण शुद्धीत राहून बजावावा, असेही आवाहन करण्यात आले. ही निवडणूक दारूमुक्त करण्याचा निर्धारही या गावांनी केला.जिंजगाव येथे बैठकीला सामाजिक कार्यकर्ते सीताराम मडावी, सुरेश मडावी, ग्रामसभा अध्यक्ष, पेसा अध्यक्ष, गावसंघटनेचे पदाधिकारी, गावकरी व महिला उपस्थित होत्या. इरकडुम्मे येथे माजी सरपंच चैतू आत्राम, पेसा अध्यक्ष राजू मुर्रा आत्राम, रामधन एक्का, आशास्वयंसेविका मीना चैतू आत्राम व ग्रामस्थ उपस्थित होते. मरपल्ली येथे पेसा अध्यक्ष सुरेश येर्रा मडावी, दिनेश तोडसाम व गावकरी उपस्थित होते. चिचोडा येथे पोलीस पाटील सीताराम नैताम, पेसा अध्यक्ष बाबुराव मडावी, बुधू नैताम व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :liquor banदारूबंदी