शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 01:34 IST

मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला.

ठळक मुद्देमुक्तिपथ अभियान : मरारटोला, बांधगाव, सोनसरी, दादापूर, वारवीत सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुक्तिपथ अभियानांतर्गत गावातील अवैैध दारू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद करण्यासाठी ग्रामसभा सरसावल्या असून कुरखेडा तालुक्यातील मरारटोला व बांधगाव येथील ग्रामसभेत दारू व खर्रा विक्री बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला.मरारटोला येथे दारू व खर्रा विक्रेत्यांना ५ सप्टेंबरपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला असून त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे ग्रामसभेत घोषित करण्यात आले. याशिवाय कुरखेडा तालुक्यातील दादापूर, वारवी, सोनसरी, येंगलखेडा, पुराडा, हेटीनगर व कासारी या गावांमध्येही दारू विक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. सोनसरी येथील ग्रामसभेत सर्वानुमते नियम लावून दारूबंदीचा ठराव घेण्यात आला. तसेच दारूबंदी संघटना स्थापन करण्यात आली. दादापूर येथील ग्रामसभा दारूबंदीच्या विषयावर गाजली. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी महिलांच्या निर्णयाला साथ देत दारूबंदीचा ठराव एकमताने पारित केला. केवळ गावच नाही तर, संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वारवी येथेही दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. भावी पिढी दारू पासून दूर राहावी या विचारातून हा निर्णय घेण्यात आला. वारवी या गावात १५ घरांमध्ये दारू काढून विकली जाते. त्यावर लवकरच आळा बसावा, अशी ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली. तसेच, कासारी या गावातही दारू विक्री बंदीबाबत निर्णय घेण्यात आला. दारू विक्रेत्यांना बोलावून त्यांच्याकडून ‘दारू विक्री करणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेण्यात आले. बैठकीला मालेवाडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेले उपस्थित होते.येंगलखेडा येथे झालेल्या ग्रामसभेत अटी व नियम लावून दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. तसेच शुक्रवारी दारूबंदीसाठी गाव सभा घेऊन संघटना स्थापन करण्यात आली.

टॅग्स :liquor banदारूबंदीgram panchayatग्राम पंचायत