शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीला विरोध कायमच

By admin | Updated: June 1, 2016 01:59 IST

वडसा वन विभागातील १२ गावांतील नागरिकांचा वन विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध कायम होता.

चर्चा फिस्कटली : अध्यक्ष व महाव्यवस्थापकांची उपस्थितीदेसाईगंज : वडसा वन विभागातील १२ गावांतील नागरिकांचा वन विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या वृक्षतोडीला विरोध कायम होता. यावर तोडगा काढण्यासाठी वन विकास महामंडळ ब्रह्मपुरीमार्फत देसाईगंज येथे नागरिकांचे चर्चासत्र बोलाविण्यात आले. मात्र या चर्चासत्रात एफडीसीएमचे पदाधिकारी व अधिकारी ग्रामस्थांची समजूत काढण्यात अपयशी ठरल्याने सदर चर्चा फिस्कटली. एफडीसीएमकडून होणाऱ्या वृक्षतोडीला या १२ गावातील नागरिकांचा विरोध अद्यापही कायमच असल्याचे या चर्चासत्रात दिसून आले.वडसा वन विभागाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित चर्चासत्राला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, उत्तर वनवृत्ताचे महाव्यवस्थापक एस. एस. डोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, नाना नाकाडे, मोतीलाल कुकरेजा, पं. स. सभापती प्रीती शंभरकर, शालू दंडवते, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, उपवनसंरक्षक होशिंग, राजपूत तसेच एफडीसीएम विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे हिरामन घराटे यांच्यासह प्रदीप बोडणे, विजय बुल्ले, उमराव हरगुळे, डॉ. वालदे, गुणवंत दडमल, काशिनाथ नारनवरे आदी उपस्थित होते.याप्रसंगी हिरामन घराटे, सुरेंद्रसिंह चंदेल, किसन नागदेवे यांनी लोकांच्या समस्या एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. दरम्यान वन विकास महामंडळामार्फत प्रोजेक्टरद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. मात्र एफडीसीएमचे अधिकारी, पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व १२ गावांतील नागरिकांमध्ये समेट घडून न आल्याने सदर चर्चा फिस्कटली. प्रास्ताविक उपवनसंरक्षक राजपूत, संचालन कापसे यांनी केले तर आभार बिऱ्हाडे यांनी मानले. (वार्ताहर)