शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील जलसाठे पडले कोरडे

By admin | Updated: May 23, 2017 00:42 IST

तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

पाणी टंचाई तीव्र : पशुंची पाण्यासाठी भटकंती वाढली; तलाव व बोड्या आटल्यालोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील बहुतांश तलाव व बोड्यांमधील पाणी पूर्णपणे आटले असून जंगली प्राण्यांसह पाळीव पशुंनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. बाहेर पाणी मिळत नसल्याने पाळीव प्राण्यांना घरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.आरमोरी तालुक्यात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे प्रत्येक गावात माजी मालगुजारी तलाव व लहान मोठ्या बोड्या आहेत. या बोड्यांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यानंतर मात्र या तलाव व बोड्या वन्यजीव तसेच पाळीव प्राण्यांची तहाण भागविण्यास फार मोठी मदत करतात. पाळीव जनावरे चरायला गेल्यानंतर तलाव व बोड्यांवरच पाणी पिऊन येत असल्याने त्यांना घरी पाणी पाजण्याची गरज भासत नाही. मात्र उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात तलाव व बोड्या आटण्यास सुरूवात झाली आहे. बहुतांश बोड्या कोरड्या ठाक पडल्या आहेत. त्यामुळे पाळीव जनावरांना बाहेर पाणी पिण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. परिणामी गावातील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गावातीलही विहिरी व हातपंप आटल्या आहेत. अशातच पाळीव प्राण्यांचीही तहान भागवावी लागत असल्याने पशु पालकांसमोर पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तलाव व बोड्या आटल्यामुळे वन्यजीवांसमोरही पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे दिसून येत आहे. वन्यजीव गावात आल्यामुळे त्यांचे शिकारीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी जवळपास २० दिवस पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट तीव्र झाले आहे. बंद हातपंप दुरूस्तीकडे यांत्रिकी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतींनी विहिरींचा उपसा करणे आवश्यक आहे.