मान्यवरांचा सूर : देसाईगंजात दिव्यांगांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान चर्चासत्र देसाईगंज : वैज्ञानिक प्रगती व विविध संशोधनाद्वारे दिव्यांगांच्या जीवनात प्रकाशमय वाटचालीची संधी आली आहे. त्यांचे खडतर जीवन अजून सोईस्कर होत आहे, असा सूर मान्यवरांनी देसाईगंज येथील चर्चासत्रात काढला. मराठी विज्ञान परिषद वडसा विभागाद्वारे राजीव गांधी विज्ञान विभाग आयोगाच्या सहाय्याने प्रस्तावित विज्ञान दिन उपक्रमांतर्गत स्थानिक स्व. राजीव गांधी निवासी मूकबधिर विद्यालय, पार्वती निवासी मतिमंद विद्यालय, शांतिवन अपंगाची कार्यशाळा व तसेच स्व.राजीव गांधी अपंग विद्यालयात दिव्यंगासाठी विज्ञान तंत्रज्ञानाचे फायदे या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शर्मिला कऱ्हाडे होत्या व प्रमुख अतिथी म्हणून मराठी विज्ञान परिषद वडसा विभागाचे कार्यवाह डॉ. सूर्यप्रकाश गभने, अरुण लांडगे, पौर्णिमा डांगे, उषा धुर्वे उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी महिला वैज्ञानिकांच्या माहितीचे पोस्टर्स लावण्यात आले व ते दिव्यांग विद्यार्थ्यांनी वाचन केले. संचालन पवन रामटेके यांनी केले. आरती पुराम, चंदनप्रकाश पटले, विनोद कुडमते, सत्यवान थेरकर, अमर पिम्पळकर, जाहेद पठान, आदित्य देशमुख, सत्यवान खोब्रागडे, पुरुषोत्तम कामथे, भास्कर रामटेके, विनोद कटरे, जयघोश राऊत, ललिता खोब्रागडे, वैशाली येवतकर, शशिकांत सोन्दरकर, सपना साखरवाडे, सोनाली मेश्राम, गजानन बारसागडे, विक्रम बोढे, बळीराम वरंभे, शालिक मिसार व सचिन कुकडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
संशोधनामुळे जीवन सोईस्कर
By admin | Updated: February 25, 2017 01:23 IST