३० चमूंचा सहभाग : कोरचीत दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोपकोरची : जय माँ शत्चंडी मानस परिवार कोरचीच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सस्वर मानस गायन स्पर्धेत जवळपास ३० चमुंनी विविध प्रकारचे उत्कृष्ट गीत सादर करून उपस्थित श्रोत्यांना रिझविले. या स्पर्धेचा समारोप रविवारी करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जि.प.चे उपाध्यक्ष जीवन नाट होते. अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच प्रतापसिंह गजभिये तर सहअध्यक्ष म्हणून पं.स. सभापती अवधराम बागमुळ उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती गोविंद दरवडे, के. डी. डोंगरे, नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, सियाराम हलामी, हेमंत मानकर, प्रेमिला काटेंगे, प्रकाश जीवानी, निलकमल मोहुर्ले, अशबतीन सोनार, केसर अंबादे, हर्षलता भैसारे, शारदा नैताम, ज्योती नैताम, हिरालाल राऊत, परदेशी बगवा, अरूण नायक, प्रियतमा जेंगठे, नंदकिशोर वैरागडे, रामदास साखरे, श्रावण अंबादे, भजन मोहुर्ले, झाडू मेश्राम, माधव जमकातन, महादेव बन्सोड, रूखमन घाटघुमर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शामलाल मडावी, संचालन हिरामन मेश्राम यांनी केले. तर आभार नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानस परिवाराचे मनोज अग्रवाल, मेघशाम जमकातन, घनशाम फुलकुंवर, रामचंद्र सोनार, अग्रवाल यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
सस्वर गायन स्पर्धेतून श्रोत्यांना रिझविले
By admin | Updated: February 1, 2016 01:31 IST