शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

११ सीआरपीएफ जवानांसह १४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:01 IST

लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रविवारी एकाच दिवशी २३ सीआरपीएफ जवानांसह ४१ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ४६ जवानांना लागण : कर्तव्यावर परत येताना बाधा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक कृषी महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात असलेल्या सीआरपीएफ ११३ बटालियनच्या नऊ तर अहेरी येथील सीआरपीएफच्या दोन व तीन सामान्य नागरिकांचे गुरूवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३९ झाली आहे. सोबतच नऊ जिल्ह्याबाहेर नोंद झाले आहेत. असे एकूण १४८ रूग्ण झाले आहेत.लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर सुट्यांवर गेलेले सीआरपीएफ जवान आपल्या कर्तव्यावर पोहोचू लागले आहेत. सीआरपीएफमध्ये कार्यरत बहुतांश जवान दुसऱ्या राज्यातील आहेत. कर्तव्यावर रूजू होणाऱ्या प्रत्येक जवानाला क्वॉरंटाईन करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत. रविवारी एकाच दिवशी २३ सीआरपीएफ जवानांसह ४१ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ६ जुलै रोजी पुन्हा चार सीआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. ७ जुले रोजी पाच, ८ जुलै रोजी तीन व ९ जुलै रोजी पुन्हा ११ सीआरपीएफ जवानांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यंत एकूण ४६ सीआरपीएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याने सीआरपीएफ जवानांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाबाधीत आढळून आलेल्या सर्वच जवानांना क्वॉरंटाईन ठेवले असल्याने त्यांचा संसर्ग इतरांना होण्याचा धोका टळला आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना सक्रीय बाधितांची संख्या ७४ झाली आहे. आतापर्यंत ६५ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या १३८ वर पोहोचली आहे. ८२ रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ९ जिल्ह्याबाहेरील आहेत. इतर नागरिकांमध्ये एक ३२ वर्षीय शासकीय कर्मचारी असून तो नांदेड येथून रूजू होण्यासाठी आला होता. त्याला अहेरी येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. इतर दोन रूग्ण गडचिरोली येथील विलगीकरण कक्षात होते. त्यापैकी एक रूग्ण गुजरात येथून परत आलेली ६५ वर्षीय महिला आहे. तर दुसरा २७ वर्षीय युवक असून तो मुंबई येथून परतला आहे. हे दोघेही समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले होते.छल्लेवाडा गावात प्रतिबंधित क्षेत्र घोषितअहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील छल्लेवाडा येथील एकाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे अहेरी तहसीलदारांनी ९ जुलै रोजी छल्लेवाडा गावातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.१,१०६ नागरिक विलगीकरणातजिल्हाभरातील विलगीकरण कक्षात १ हजार १०६ नागरिक होते. आजपर्यंत ८ हजार ४६० नागरिकांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ७ हजार ९४८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. ५१२ नमुन्यांचा अहवाल शिल्लक आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या