शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लक्षणे नसतानाही धानोरातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 5:00 AM

येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांमुळे खळबळ : भुसावळ येथून परतले होते गावी; रूग्ण असलेला परिसर केला प्रतिबंधित

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : येथील दोन रूग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने नगरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, क्वॉरंटाईन कालावधीत जळपास १४ दिवस त्यांना कोणतीही लक्षणे दिसून आली नाही. तरीही ते कोरोनाबाधित आढळल्यामुळे धानोरा शहरात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.येथील मुळ रहिवासी असलेले मुलगा व आई हे दोघेजण भुसावळ तालुक्यातील एका गावी नातेवाईकाकडे गेले होते. दरम्यान लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते भुसावळ तालुक्यातच अडकून पडले होते. शासनाने परवानगी दिल्यानंतर ते १४ दिवसांपूर्वी धानोरा येथे परत आले. परत आल्यानंतर त्यांना क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. क्वॉरंटाईन कालावधीत दोघांनाही कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे त्यांची १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर सुटी करण्यात आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने दोघांचेही स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविले होते. २८ मे रोजी या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजताच त्या रुग्णांचे घर व परिसर सील करण्यात आला आहे. तसेच रूग्णांना गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.तहसीलदार महेंद्र गणवीर, संवर्ग विकास अधिकारी बंडू निमसरकार, पोलीस निरिक्षक विवेक अहिरे, सहायक पोलीस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी या भागाला भेट देऊन पाहणी केली. आरोग्य विभागाच्या स्वतंत्र टिम तयार करण्यात आल्या आहेत. त्या वार्डातील प्रत्येक नागरिकाची दरदिवशी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. धानोरातील मार्केट पूर्णपणे बंद ठेवले आहे. मात्र रूग्ण सापडलेल्या परिसरातील काही भागातच जंतूनाशकांची फवारणी केली. वेळ झाल्याचे कारण सांगून आरोग्य विभागाचे पथक परत गेले, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.काही दिवस थांबले घरीभुसावळ वरून आल्यानंतर आरोग्य विभागाने मुलगा व आई दोघांनाही संस्थात्मक क्वॉरंटाईन केले. मात्र त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने १३ दिवसांच्या क्वॉरंटाईन कालावधीनंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. २५ मे ला सुटी दिली, असे सांगितले जात आहे. तेव्हापासून २५ ते २८ मे पर्यंत दोघेही स्वत:च्या घरी थांबले होते. त्यामुळे ते राहत असलेल्या वॉर्डवासीयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा वार्डात कोणाकोणाशी संपर्क आला, याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र सावसागडे यांनी केले आहे.धानोरा तालुक्यात शासकीय आदिवासी मुले व मुलींचे वसतिगृह, सोडे व पेंढरी येथील आश्रमशाळा क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी २८ मे पर्यंत ९६ लोक थांबले आहेत. १०० लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी ६५ नमुन्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला. तर ३५ नमुन्यांचा रिपोर्ट अजून येणे शिल्लक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या