शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘केबीसी’त जिंकलेल्या रकमेतून तलावांची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:51 IST

एका टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये शुक्रवारी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जिंकलेली रक्कम भामरागड तालुक्यातील तलावांच्या दुरूस्ती व नवीन तलावांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा मनोदय आमटे परिवाराने व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देएकूण ५० लाखांची रक्कम : गावकऱ्यांच्या मागणीनुसार खर्च करण्याचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एका टीव्ही वाहिनीवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअ‍ॅलिटी शो मध्ये शुक्रवारी डॉ.प्रकाश व डॉ.मंदाकिनी आमटे यांनी जिंकलेली रक्कम भामरागड तालुक्यातील तलावांच्या दुरूस्ती व नवीन तलावांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा मनोदय आमटे परिवाराने व्यक्त केला आहे.७ सप्टेंबर प्रसारित झालेल्या या शो मधील ‘कर्मवीर’ या विशेष भागात हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक आणि ज्येष्ठ समाजसेवी डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आमटे दाम्पत्याने दुर्गम आदिवासी क्षेत्रात राहून तेथील नागरिकांना दिलेल्या आरोग्य सेवेचा परिचयही करून देण्यात आला. आमटे दाम्पत्याने या कार्यक्रमादरम्यान विविध प्रश्नांना योग्य उत्तरे देऊन २५ लाख रुपये जिंकले. यावेळी कार्यक्रमाचे संचालनकर्ते असलेल्या महानायक अमिताभ बच्चन यांनी जिंकलेल्या रकमेएवढीच रक्कम अ‍ॅक्सिस बँक फाऊंडेशनच्या वतीने आमटे दाम्पत्याच्या कार्यासाठी देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार एकूण ५० लाख रुपयांची रक्कम त्यांना या कार्यक्रमातून मिळाली आहे.यासंदर्भात आमटे दाम्पत्याचे चिरंजीव डॉ.अनिकेत आमटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, त्या रकमेतून ज्या गावांमध्ये तलावांचे खोलीकरण किंवा नवीन तलाव बनविण्याची गरज आहे ते काम केले जाईल. हे ते गावकरीच ठरवतील असेही त्यांनी सांगितले. त्या तलावांमधून शेतीसाठी पाणी मिळण्यासोबतच मासेमारीही केली जाणार आहे.या गावांत झाली कामेलोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने यापूर्वी भामरागड तालुक्यातील जिंजगाव, हेमलकसा गावांत २ तलाव, कुमरगुडा, दर्भा, नेलगुंडा, पीडीमिली, हलवेर, नारगुंडा, कोडपे, दुडेपल्ली, मडवेली, कोयनगुडा, टेकला येथे तलावांची निर्मिती आणि खोलीकरण करण्यात आले आहे. कोईनगुडा आणि जिंजगाव येथे पाण्याची टाकी, विहीर, सोलरपंप आणि नळाची पाइपलाईन टाकण्यात आली.