शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली-विसापूर मार्गाची दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:30 IST

गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली.

ठळक मुद्देनागरिकांचा पुढाकार : मोहलीनजीक श्रमदानातून बांधला दोन किमीचा कच्चा रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/रांगी : गडचिरोलीच्या नगर पालिकेचे पाणी पुरवठा सभापती केशव निंबोड यांच्या पुढाकाराने नागरिकांनी श्रमदानातून गडचिरोली-विसापूर मार्गावरील खड्डे बुजवून या मार्गाची दुरूस्ती केली. तसेच धानोरा तालुक्यातील मोहली नजीक असलेल्या मेटेजांगदा येथील नागरिकांनी मेटेजांगदा-मामा तलावपर्यंतचा दोन किमीचा कच्चा रस्ता श्रमदानातून बांधला.मेटेजांगदा गावातील नागरिकांना तलावात ये-जा करण्यासाठी रस्त्याअभावी अडचण निर्माण होत होती. या समस्येची दखल घेत येथील विशेष ग्रामसभेत श्रमदानातून रस्ता बांधण्याबाबत ठराव घेण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व नागरिकांनी श्रमदानातून दोन किमीचा कच्चा रस्ता तयार केला. या रस्त्यावर मुरूम पसरविण्यात आले. यावेळी मंसाराम कोल्हे, सुधाकर कोल्हे, काशिराम हलामी, बाबुराव कुमोटी, आनंदराव बोगा, शांताराम कुमोटी, प्रमोद कोल्हे, बाजीराम कुमोटी यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.गडचिरोली-विसापूर-विसापूर टोलीकडे जाणाºया मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. सदर मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनाची मोठी वर्दळ राहत असल्याने रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत होता. सदर मार्गावर आजपर्यंत अनेकदा अपघात घडले. त्यामुळे सदर रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती करण्याचा निर्णय पालिकेचे पाणी परुवठा सभापती तथा विसापूर वार्डाचे नगरसेवक केशव निंबोड यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासह विसापूर भागातील नागरिकांना या कामासाठी प्रोत्साहित करू, सिमेंट काँक्रीटने या मार्गावरील खड्डे बुजवून घेण्याचे काम पूर्ण केले. तसेच निंबोड यांच्या उपस्थितीत विवेकानंद परिसरातील मातोश्री वृध्दाश्रमात वृध्द नागरिकांना ब्लँकेट व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, सोनटक्के, सुनिल पोरेड्डीवार, राजू पोटे, जनार्धन साखरे, गोंदरे, डोर्लीकर, तलाठी बांबोळे यांच्यासह विसापूर भागातील नागरिक उपस्थित होते.