शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे नव्याने बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 5:00 AM

झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांधकामाची होती. यात सिमेंट काँक्रिटचे कॉलम नव्हते.

ठळक मुद्देनागरिकांची मागणी । जुन्याच भिंतीवरून सुरू आहे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम ३० वर्षांपूर्वी झाले होते. परंतु अल्पावधीतच इमारत जीर्ण झाली. त्यामुळे नागरिकांच्या मागण्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. परंतु जुन्याच भिंतीवरून स्लॅब टाकण्याच्या कामाला सुरूवात झाल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. जुन्याच इमारतीवर नवीन बांधकाम न करता संपूर्ण इमारतीचे नव्याने बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.झिंगानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. तसेच इमारतीची मोडतोड करण्यात आली. त्यामुळे भिंतीवर भेगा पडल्या. सध्या या पैकी दोन भिंती कोसळण्याच्या स्थितीत आहेत. जुनी इमारत सिमेंट, विटाच्या बांधकामाची होती. यात सिमेंट काँक्रिटचे कॉलम नव्हते. त्यावर स्लॅब टाकण्यात आले होते. परंतु आता दुरूस्ती करताना स्लॅब तोडून काही प्रमाणात भिंती पाडण्यात आल्या. परिणामी भिंतींना भेगा पडल्या. परंतु याच भिंतींवर स्लॅब टाकण्याचे काम होणार असल्याचे दिसून येते. झिंगानूर येथील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे येथे नवीन आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्याची मागणी केली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन येथे नव्याने इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी झिंगानूर येथील नागरिकांकडून होत आहे.शेडमध्ये उपचारझिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्याच इमारतीवर नव्याने बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून टिनाचे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये रुग्णांच्या नोंदणीसह औषधोपचार केला जात आहे. त्यामुळे नवीन इमारतीचे लवकर बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य