रेखेगावपासून अनंतपूर-कुदरशी टोला-जगमपूर-भाडभिडी मार्गे हा रस्ता घोटकडे निघतो. तालुका मुख्यालयात जाण्यासाठी या मार्गाने नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते. रेखेगावापासून जगमपूर फाट्यापर्यंत ४ किमीचे अंतर आहे. या चार किमी रस्त्याचे सात वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर २०१७-१८ मध्ये रस्त्याची रुंदी वाढविण्यात आली व मार्गाचे नूतनीकरण झाले. मात्र, मध्यंतरीच अनंतपूर गावापासून परशुराम वैरागडे यांच्या शेतापर्यंत अर्धा किमी रस्त्याचे नूतनीकरण अर्धवट स्थितीत ठेवण्यात आले. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील पावसाळ्यात या मार्गाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. त्यामुळे वाहनधारकांची दिशाभूल झाली. अनेक किरकाेळ अपघात या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी केली आहे. आमगाव परिसरातील अनंतपूर व कुदरशी टाेला येथील नागरिकांनी अनेकदा या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी संबंधित विभागाकडे केली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
कुदरशी मार्गाचे नूतनीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:37 IST