शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

प्राणहिता नदीवरील दारू दुकाने हटवा

By admin | Updated: November 14, 2015 01:31 IST

तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी,..

अमोल मुक्कावार यांची मागणी : कागजनगरच्या आमदारांशी चर्चा करून दिले निवेदन अहेरी : तेलंगणा व अहेरी तालुक्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या प्राणहिता नदी काठावर असलेले दारूची दुकाने हटवून ती कमीतकमी ४० किमी अंतरावरापलीकडे लावावी, अशी मागणी अहेरी नगर पंचायतीचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी तेलंगणाचे आ. कानेरू कोनप्पा यांना निवेदन देऊन केली आहे. या समस्येसंदर्भात मुक्कावार यांनी कोनप्पा यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली.ंअहेरी-गुडेम पुलाबाबत चर्चा करण्यासाठी तेलंगणा राज्यातील कागजनगरचे आ. कोनप्पा हे अहेरी येथे आले होते. यावेळी अमोल मुक्कावार यांनी कोनप्पा यांना निवेदन देऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान अमोल मुक्कावार यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दशकापेक्षा अधिक कालावधीपासून दारूबंदी आहे. याचा गैरफायदा उचलण्यासाठी तेलंगणा राज्यातील काही दारू दुकानदारांनी दारूची दुकाने प्राणहिता नदीच्या काठावर स्थापन केली आहेत. या दारू दुकानांमध्ये तेलंगणा राज्यातील फारसे ग्राहक येत नाही. मात्र या दुकानांमधून नदी मार्गे दारूची वाहतूक अहेरी तालुक्यात केली जाते. त्यामुळे दारूबंदीचा अहेरी तालुक्यात काहीच परिणाम दिसत नाही. यामुळे दारू दुकानदार व अहेरीतील दारू विक्रेते गब्बर होत चालले असले तरी सामान्य नागरिकांचे कुटुंब मात्र रस्त्यावर आले आहे. त्यामुळे तेलंगणा राज्याने याबाबीची दखल घेऊन नदीपासून ४० किमीच्या अंतरात दारूची दुकाने थाटण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)वांगेपल्ली पुलानंतर अहेरीतील दारूबंदीवर परिणामतेलंगणा राज्य शासनाने पुढाकार घेत प्राणहिता नदीवर पूल बांधकामासाठी सुमारे ९५ कोटी रूपये मंजूर केल आहेत. या पुलाचे बांधकामाची निविदाही काढण्यात आली असून प्रत्यक्ष कामाला जानेवारी महिन्यात सुरुवात होणार आहे. तेलंगणा राज्यात प्राणहिता नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर दारूची दुकाने थाटली आहेत. या दुकानातील दारू सध्य:स्थितीत नदीद्वारे आणली जात आहे. नदीतून दारू आणताना अनेक अडचणींचा सामना दारूविक्रेत्यांना करावा लागत आहे. त्यामुळे दारूच्या वाहतुकीवर मर्यादा पडल्या आहेत. मात्र प्राणहिता नदीवरील वांगेपल्ली पुलाची निर्मिती झाल्यानंतर पुलावरून खुलेआम दारू आणली जाईल. त्याचबरोबर अहेरी परिसरातील नागरिकांनाही तेलंगणा राज्यात दारू पिण्यासाठी जाणे सोयीचे होणार आहे. परिणामी या पुलामुळे अहेरी व परिसरात आणखी दारूचे लोट वाहणार आहेत. त्यामुळे नदीपुलाच्या निर्मितीपूर्वीच दारूची दुकाने हटविणे गरजेचे आहे.