लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : पावसाच्या पाण्यावर १०० टक्के अवलंबून असणाऱ्या व उंच भागातील (वरटेकरी) शेतातील धान पऱ्हे रोवणीयोग्य झाली आहेत. महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही गेल्या १२-१३ दिवसांपासून पाऊस बरसत नसल्याने देसाईगंज तालुक्यातील शेतजमीन कोरडे दिसून येत आहे. शिवाय धानाचे पऱ्हे पाण्याअभावी पिवळे पडून करपत असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्या शेतकऱ्यांकडून सिंचन विहीर, मोटारपंप, ऑईल इंजिन व इतर सुविधा आहेत, अशा शेतकऱ्यांची धान रोवणी लगबगीने आटोपून घेण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची शेती पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अलंबवून आहे, अशा शेतात पाणी नसल्याने शेतजमीन कोरडी पडली आहे.पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेतीपाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सुध्दा फुसका बार राहिला व नेहमीच हुलकावणी देणारा पाऊस अशी ख्याती असणाऱ्या पुनर्वसुही हुलकावण्या देऊन गेला. विशेष म्हणजे पुनर्वसुच्या पहिल्या दिवशी पडलेल्या दमदार पावसाने रोवणी सुरू झाली. परंतु ज्या शेतात वा शेतालगत जलस्त्रोत आहेत तसेच खोलगट, सखल भागात पाणी साचले अशाच शेतामधील रोवणी झाली व आताही सुरू आहे.दोन आठवड्यापासून रोवणीसाठी पाऊस पडतच नाही त्यामुळे उंच, टेकडी भागातील शेतातील धान पऱ्हे पिवळे पडू लागले आहेत. विहीरगाव येथील शिवारातल्या शेतातील पऱ्हे पिवळे पडले. जमीन पाण्याविना कोरडी पडली आहे. त्यामुळे पिवळे पडलेले वाफे करपण्याच्या मार्गावर आहेत. धान पेरून महिनाभराचा कालावधी झाला आहे. पऱ्ह्यांना ४० दिवस झाले आहेत. पºहे रोवणीयोग्य झाले आहेत. परंतु पाऊस नाही, पाणी नाही. परिणामी शेतकरी चिंतातूर झाले आहेत.विसोराच्या आसपास इटियाडोह कालव्याचे, गाढवी नदीचे पाणी पोहोचत असल्यामुळे रोवणी सुरू आहे. दुसरीकडे वरच्या पाण्यावर पिकणाऱ्या शेतातील पऱ्हे पाणी नसल्याने करपत आहेत. जमीन दगडासमान कडक होत आहे. शेतकरी पेचात सापडला आहे.पेरणी पूर्व मशागत ते पेरणी पर्यंतचा सर्व खर्च वाया जाऊन शेती तोट्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता धान पीक पºहे रोवणीची झाली आहेत. त्यामुळे येत्या आठवडा भरात पाऊस आल्यास पऱ्हे रोवणीला सुयोग्य राहतील. या कालावधीनंतर पाऊस न आल्यास पऱ्हे करपून शेती धानपीकाशिवाय रिकामी राहील. परिणामी पाऊस न झाल्यास शेती अडचणीत येणार आहे.पुष्य नक्षत्रावर भिस्तयंदा सुरुवातीच्या तीनही नक्षत्रात थोडाफार पाऊस झाला. आज तिसरा नक्षत्र पूनर्वसू संपला व पुष्य नक्षत्र सुरू झाला. गाढव वाहनाचा पुष्य कुठे जास्त, कुठे कमी असा स्वरूपाचा असल्याने आता रोवणीची कामे अजूनही सुरू न झालेल्या धान शेतीची सारी भिस्त याच नक्षत्रावर आहे. पाऊस पडत नसल्यामुळे पाणी देऊन रोवणी पूर्ण केलेल्या शेताच्या पिकांची स्थितीसुद्धा धोक्याची ठरू शकते.अर्धवटच रोवणीकसारी येथील मोठ्या तलावाच्या खालील एका शेतात तर एक विचित्र परिस्थिती दिसून आलेली आहे. त्या शेतामध्ये विहीर आहे, सौरऊर्जा पंप असून जेव्हापर्यंत विहिरींमध्ये पाणी होते त्या पाण्यावर एकाच शेतातील अर्ध्या जमिनीवर रोवणी झाली आहे तर अर्ध्या जमिनीवर विहिरीमध्ये पाणी नसल्याने जमीन कोरडी पडली आहे. रोवणीसाठीचे पऱ्हे पावसाअभावी करपत आहेत. याच शेतातील पाण्याविना कोरड्या पडलेल्या एका बांधीमध्ये रोवणीला चिखलणी करण्यासाठी एक लाकडी फण ठेवले आहे. आणि रोवणी करून उरलेला अर्धा धान वाफा सुद्धा दिसत आहे.
पावसाच्या भरवशावरील धान पऱ्हे करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 05:00 IST
पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेती पाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सुध्दा फुसका बार राहिला व नेहमीच हुलकावणी देणारा पाऊस अशी ख्याती असणाऱ्या पुनर्वसुही हुलकावण्या देऊन गेला.
पावसाच्या भरवशावरील धान पऱ्हे करपले
ठळक मुद्देनाले व तलाव कोरडेच : पावसाअभावी धान पीक रोवणीस प्रारंभच नाही, शेतकरी सापडला विवंचनेत