शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'अपने ही लोग है, गोली मत चलावें'; माओवाद्यांकडून युद्धविरामाचा पुनरुच्चार

By संजय तिपाले | Updated: April 10, 2025 21:25 IST

चेंडू पुन्हा सरकारच्या कोर्टात

संजय तिपाले, गडचिरोली : छत्तीसगडसह महाराष्ट्रात  धडक मोहिमा राबविल्याने धडकी भरलेल्या माओवाद्यांनी २८ मार्च रोजी तेलुगुमधून पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. आधी शस्त्रे टाका व आत्मसमर्पण करा, अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर हादरलेल्या माओवाद्यांचे ८ एप्रिल रोजीचे एक पत्रक १० एप्रिल रोजी समोर आले असून त्यात युध्दविरामाचा पुनउर्च्चार केला आहे.   जवानांना उद्देशून 'अपने ही लोग है, गोली मत चलावें' अशी विनंती करतानाच  बस्तरमधील मोहिमा थांबवून अनुकूल वातावरण बनवावे व  शांतीवार्ता करावी  , असे नमूद करुन माओवाद्यांनी युध्दविरामाचा चेंडू सरकारकडे टोलविला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्यानुसार, गेल्या १५ महिन्यांत ४०० हून अधिक माओवाद्यांना ठार करुन जवानांनी सळो की पळो करुन सोडले आहे. छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा आणि झारखंड  या राज्यात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने पत्रक जारी करुन सरकारपुढे युध्दविरामाचा प्रस्ताव ठेवला होता. दरम्यान, ८ एप्रिल रोजी उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याचे पत्रक समोर आले आहे. त्यात शांतीवार्तासाठी आम्ही तयार आहोत, पण त्यासाठी अनुकूल वातावरण गरजेचे आहे, अशी भूमिका मांडली आहे.

ही सरकारची जबाबदारी...

पत्रकात म्हटले आहे की, छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी युध्दविरामाचा प्रस्ताव पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरणाची मागणी फेटाळून लावली आहे. मात्र, आत्मसमर्पण हे सगळ्या समस्यांचे उत्तर नाही, यावरुन असे दिसते की सरकारला माओवादविरोधी मोहिमा यापुढेही राबवायच्या आहेत. मात्र, कारवाया थांबविल्या, वातावरण अनुकूल झाले तरच शांतीवार्ता करता येईल, ही सरकारची जबाबदारी आहे.रेशन, वीज, पाणी, आरोग्य सुविधांना विरोध नाही

छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा आणि विजापूर सीमावर्ती भागातील एकेली आणि बेलणार परिसरात ३१ मार्चला रेणुका उर्फ बानू या महिला माओवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. याचा उल्लेख पत्रकात असून ती प्रतिकूल परिस्थितीतही लढत राहिल्याचे म्हटले आहे. आम्हाला जनताविरोधी ठरवले जात आहे. मात्र, शाळा, अंगणवाडी, दवाखाना, रेशन, पाणी व वीज या मूलभूत बाबींना कधी विरोध केलेला नाही. एक- दोन विषयांत घाईघाईने चुका झाल्या, त्यानंतर आम्ही माफी मागितल्याचाही उल्लेख पत्रकात आहे.

पत्रक पाहिले आहे. मात्र, माओवाद्यांनी आत्मसमर्पण करणे हाच योग्य मार्ग आहे. त्यांनी हिंसेची वाट सोडावी व आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्गाने आपले उर्वरित जीवन सुखकर करावे. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली  

टॅग्स :naxaliteनक्षलवादी