शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

दुर्गम गावांचे पुनर्वसन रखडले

By admin | Updated: March 6, 2015 01:31 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी ...

गडचिरोली : गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अजूनही ७० ते ८० गावामध्ये रस्ता व ६० गावांमध्ये विज पोहचलेली नाही. भामरागड, कोरची आदी तालुक्यामध्ये अनेक कमी लोकसंख्येचे गाव आहेत. या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली होती. परंतु ही योजना अद्यापही मूर्तरूप घेऊ शकलेली नाही. त्यामुळे ही गावे सोयीसुविधांपासून वंचित राहिली आहे. व प्रशासनाही येथे विज, पाणी, रस्ते आदी पोहचविण्यात अडचणी येत आहेत.गडचिरोली जिल्हा हा विस्ताराने प्रचंड मोठा आहे. जवळजवळ ४२० किलोमिटरच्या परीघात या जिल्ह्यातील १२ तालुके येतात. यातील कोरची व भामरागड हे छत्तीसगड सीमेवरचे संवेदनशील तालुके आहेत. या तालुक्यात अनेक गावे ही दीडशे दोनशे वा त्यापेक्षा कमी लोकसंख्येची आहे. या गावात जिल्हा प्रशासनाचे अधिकारीही कधी जात नाही. येथील जनतेला अजूनही मुलभूत सोयीसुविधा प्रशासनाला पोहचविता आल्या नाही. एकच नाला किमान पाच ते सात वेळा ओलांडून या गावात पायी जावे लागते. भामरागड तालुक्यात १२८ गावे आहेत. कोरची तालुक्यात १३३ गावे आहेत. यातील किमान ३० ते ४० गावातील नागरिकांपर्यंत वीज, पाणी अजुनही पोहचलेले नाही. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा परिसरातील सात ते आठ गावांमध्ये केवळ सरकारच्या शाळा व ग्रामपंचायतीच सुरू होऊ शकल्या. बाकी सोयीसुविधांचा पत्ताही नाही. जिल्ह्यातील अशा गावांची आकडेवारी तयार करून या गावातील नागरिकांना तालुका मुख्यालयात आणून वसविण्याची योजना प्रशासनाने तयार केली होती. तालुका मुख्यालयात आणल्यावर तेथे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरचा भारही बराचसा हलका होणार होता. शिवाय सर्व नागरिकांना सोयीसुविधाही देणे शक्य होणार होते. परंतु या भागातील नागरिक या पुनर्वसनासाठी राजी झाले नाहीत असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला आहे.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने काही दिवसांपूर्वी लहान गावातील आश्रमशाळा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयावर अंमलबजावणी झाली नाही. गडचिरोली जिल्ह्यात अनेक गाव नक्षली दहशतीच्या छायेत आहे. या गावातील सधन नागरिकांनी गाव सोडून तालुका मुख्यालयात घर बांधले आहे. त्यामुळे त्यांचा गावाशी संपर्क तुटला आहे. मात्र दारिद्र्य रेषेखालील लोक गावातच राहतात. (प्रतिनिधी)