शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
4
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
5
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
6
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
7
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
8
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
9
'माऊस जगलर' वापरून एकाचवेळी ५ कंपन्यात नोकरी; वर्षात ७ कोटींची कमाई; कसा झाला भांडाफोड?
10
नीरेचा नदीकाठ आक्रोशाने गहिवरला; 36 तासानंतर सापडला आजीसोबत पंढरपूरला निघालेल्या गोविंदाचा मृतदेह
11
“तळीये गावातील दरडग्रस्त कुटुंबियांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे”; अंबादास दानवेंची मागणी
12
Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!
13
Sonam Raghuwanshi : "राजा रघुवंशीच्या हत्येनंतर सोनमने बॉयफ्रेंड राजशी केलं लग्न", सासरच्यांचा खळबळजनक आरोप
14
Royal Enfield: रॉयल एनफिल्डच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'या' धमाकेदार बाईकची विक्री पुन्हा सुरू!
15
अहमदाबाद अपघातानंतर एअर इंडियाला आणखी एक धक्का! दिल्ली-वॉशिंग्टनला जाणारे विमान वाटेतच रद्द
16
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
17
"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?
18
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
19
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
20
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

१ कोटी २६ लाखांचा परतावा

By admin | Updated: April 9, 2016 00:38 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीच्या वतीने २०१५- १६ या हंगामात १ कोटी ४६ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले होते.

गत हंगामात १ कोटी ४६ लाखांचे वितरण : जिल्हा बँक अहेरी शाखेची ८६ टक्के कर्ज वसुलीअहेरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीच्या वतीने २०१५- १६ या हंगामात १ कोटी ४६ लाख रूपयांचे शेतकऱ्यांना कर्ज वितरण करण्यात आले होते. याचा लाभ ३३३ शेतकऱ्यांना झाला होता. ३१ मार्च २०१६ पर्यंत २७९ लाभार्थी शेतकऱ्यांनी एकूण १ कोटी २६ लाख रूपयाचा परतावा केला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरीची ८६ टक्के कर्ज वसुली झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अहेरी व विविध सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मागील हंगामात कर्ज वितरण करण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत २७९ शेतकऱ्यांनी कर्जाचा परतावा केला आहे. पुनर्पिककर्ज १५ दिवसांत मिळणार असल्याचे बँकेने जाहीर केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसनवारी व इतर मार्गांनी पैशांची तजवीज करून ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड केली. त्यामुळे २७९ शेतकऱ्यांनी एकूण पीक कर्जापैकी ८६ टक्के कर्ज परतावा केला. त्यामुळे शेतकरी बँकेच्या व्याज दरापासून मुक्त झाले आहेत. कर्ज वसुली करण्याकरिता बँकेचे वसुली अधिकारी तसेच विविध कार्यकारी संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी कर्जधारक सभासदांच्या भेटी घेऊन त्यांना कर्जमुक्तीसाठी प्रवृत्त केले. त्यामुळेच अहेरी जिल्हा सहकारी बँक शाखेची ८६ टक्के कर्जवसुली होण्यास मदत झाली. अनेक शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले. (तालुका प्रतिनिधी)दुष्काळाच्या मोबदल्यापासून शेतकरी वंचितमागील खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने दरवर्षीच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत मागील हंगामाचे एकूण उत्पादन ३० ते ४० टक्केच आहे. अनेक शेतकऱ्यांना २० ते ३० टक्के एकूण उत्पादनावर समाधान मानावे लागले. जिल्ह्यात १३९८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. मात्र अहेरी उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना दुष्काळातील मदतीचा मोबदला मिळाला नाही. अनेक शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.