शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

समित्यांची नेमणूक रखडली

By admin | Updated: March 16, 2017 01:21 IST

राज्य सरकारचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असताना गडचिरोली जिल्ह्यात अजूनही शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य,

पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष : भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी गडचिरोली : राज्य सरकारचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असताना गडचिरोली जिल्ह्यात अजूनही शासनाच्या विविध समित्यांवर सदस्य, अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये पालकमंत्री व लोकप्रतिनिधींविषयी कमालीची नाराजी पसरली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात भाजपला निर्विवाद यश मिळाले. भाजपच्या या यशात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे योगदान मोठे आहे. या दोन मोठ्या निवडणुकानंतरही नगर पंचायती, नगर पालिका व अलिकडेच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातही भाजपच्या यशाच्या घोडदौड कायम आहे. मात्र राज्यात व केंद्रात सरकार असतानाही जिल्हास्तरावर संजय गांधी निराधार योजनेच्या तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या नाही. याशिवाय तालुका व जिल्हा पातळीवर जवळजवळ २० ते २५ शासकीय समित्या आहेत. यावर भाजप कार्यकर्त्यांची सहजपणे वर्णी सदस्य व अध्यक्ष म्हणून लावता येऊ शकते. मात्र या समित्या निवडीचे अधिकार पालकमंत्र्यांकडे आहेत. त्यांना अद्याप या कामासाठी वेळ मिळालेला नाही. त्यामुळे या समित्यांचे गठन रखडलेले आहे. लोकप्रतिनिधी खासदार, आमदारही याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. राज्यस्तरावरील काही समित्यांवर जिल्ह्यातील भाजपच्या नेते मंडळींची निवड होणार होती. तीही रखडलेली आहे. पक्षासाठी काम करून उपयोग काय, अशी प्रतिक्रिया आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.