अडीच तास चालली मोहीम : ६० वाहनचालकांवर कारवाईकुरखेडा : सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांसह अल्पवयीन वाहनचालक व विना परवाना वाहन चालविणाऱ्यांवर कुरखेडा पोलिसांनी सकाळी ११ ते दुपारी दीड वाजेपर्यंत कारवाई करून ६० वाहनचालकांकडून १२ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे. कुरखेडा, वडसा मार्गावर बायपास फाट्याजवळ पोलिसांनी ही धडक मोहीम हाती घेतली होती. शहरात गेल्या काही दिवसांपासून विना परवाना दुचाकी वाहन सुसाट वेगाने धावत होते. या वाहनचालकांमुळे अनेक अपघातही झालेत. याबाबीची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदार योगेश घारे यांच्याकडे सदर वाहनचालकांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रार केली होती. त्यानंतर गुरूवारी ठाणेदार घारे यांनी स्वत: हजर राहून बायपास मार्गावर नाकेबंदी केली व ६० वाहनचालकांवर कारवाई करून सरकार दप्तरी १२ हजार रूपयांचा दंड वसूल केला. सर्व दंड नगदी स्वरूपात वसूल झाला आहे. ही मोहिम पोलीस उपनिरिक्षक वनकर, पोलीस हवालदार केशव दादगाये, वसंता जौंजाळकर, अरूण पारधी, सुखदेव मडकाम सहभागी झाले होते.
कुरखेडात सुसाट दुचाकीस्वारांकडून १२ हजारांचा दंड वसूल
By admin | Updated: April 7, 2017 01:06 IST