१३३ प्रकरणे दाखल : गौणखनिजाचे अवैध उत्खननगडचिरोली : जिल्हा खनिकर्म विभागाकडून गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात दरवर्षी लिलाव प्रक्रिया राबवून कंत्राटदारांना खाणी व रेतीघाट दिले जाते. मात्र अनेक कंत्राटदार रॉयल्टीपेक्षा अधिक प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करतात. या संदर्भात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबवून एप्रिल व मे २०१६ या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण १३३ प्रकरणे दाखल करून संबंधित कंत्राटदाराकडून एकूण १२ लाख २० हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.एटापल्ली उपविभाग कारवाईत पिछाडीवरगडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज या चार उपविभागात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी मोठ्या प्रमाणात कारवाई करून लाखो रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अहेरी उपविभागात ३७ प्रकरणे दाखल करून १ लाख ९९ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र एटापल्ली उपविभागाने सर्वात कमी ५९ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.गडचिरोली उपविभागात धानोरा तालुक्यात तहसीलदार व तलाठ्यांनी धाड टाकून दोन महिन्याच्या कालावधीत १० प्रकरणे दाखल करून अवैध उत्खननातून संबंधित कंत्राटदाराकडून ६० हजार ८०० रूपयांचा तर गडचिरोली तालुक्यात ३८ प्रकरणे दाखल करून एकूण ३ लाख ११ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध उत्खनन प्रकरणी गडचिरोली उपविभागात दोन महिन्यात ४८ प्रकरणे दाखल करून एकूण ३ लाख ७२ हजार ४०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. चामोर्शी उपविभागात मुलचेरा व चामोर्शी तालुका मिळून गौण खनिजाच्या अवैध उत्खननाचे एकूण १५ प्रकरणे दाखल करून संबंधित कंत्राटदाराकडून ३ लाख ८० हजार ६५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. देसाईगंज उपविभागात २२ प्रकरणातून १ लाख ७५ हजार २०० तर कुरखेडा उपविभागात चार प्रकरणातून ३ लाख ३ हजार रूपयांचा दंड संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आला.जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी धाडसत्र राबवून संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे सक्त निर्देश महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
१२ लाख दंड वसूल
By admin | Updated: June 16, 2016 01:58 IST