शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रकल्पातून ४१ हजार प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:33 IST

गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देअरततोंडी ग्रामपंचायतीचा उपक्रम : एटीएमद्वारे पाच रूपयात २० लिटर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गावकऱ्यांना थंड व शुध्द पाणी मिळावे, या हेतुने तालुक्यातील अरततोंडी ग्रामपंचायत प्रशासनाने आरओ पाणी प्रणाली व शुध्दीकरण प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून अरततोंडी ग्रामपंचायतीला दीड वर्षात एटीएम रिचार्ज कार्डातून ४१ हजार ७० रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.सदर प्रकल्पांतर्गत एटीएम कार्डद्वारे पाच रूपयांत पिण्यासाठी २० लिटर थंड व शुध्द पाणी मिळत आहे. सदर पाण्याचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे. सदर उपक्रमाबाबत या ग्रामपंचायतीचे कौतुक होत आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळावे, यासाठी २०१५ मध्ये ग्रामसभेने पाणी प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. पेसा अंतर्गत ग्रामसभा कोष समितीच्या पाच टक्के अबंध निधीतून सदर उपक्रमासाठी ४ लाख ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. मागील दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून हा पाणी प्रकल्प सुरू आहे. अरततोंडी गट ग्रामपंचायती अंतर्गत अरततोंडी, खरमतटोला व देऊळगाव येथील ३८९ कुटुंबातील २ हजार ११८ लोकांना हे शुध्द पाणी उपलब्ध होत आहे. २० लिटरची प्लास्टिक कॅन प्रत्येक कुटुंबासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वीज बिलाचा खर्च वाचविण्यासाठी सौरऊर्जेवर हा प्रकल्प यापुढे चालविण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक महेंद्र देशमुख यांनी दिली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई