शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील रेशन दुकानदार संपावर ठाम; कमिशनमध्ये वाढ आणि मार्जिन मध्ये देखील सुधारणा करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 14:58 IST

निवेदन: प्रति क्विंटल ३०० रुपये कमिशन द्या

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आजच्या महागाई निर्देशांकानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिन मध्ये किमान ३०० रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी, तसेच रास्त भाव दुकान मार्जिन करिता महागाई निर्देशांक लागू करण्यात येऊन प्रतिवर्षी महागाई निर्देशांकातील बदलानुसार रास्त भाव दुकान मार्जिन मध्ये देखील आवश्यक सुधारणा करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी राज्यभरातील दुकानदार संपावर जाणार आहेत. त्याला जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना पाठिंबा दर्शवला आहे. तसे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

केंद्र शासनाद्वारे सन २०२२ मध्ये राज्य सरकारांना सुनिश्चित आर्थिक सहाय्य (सुधारणा) नियम, २०२२ नुसार सुधारित केलेल्या २० रुपये प्रति क्विंटल या मार्जिन वाढीनुसार तफावतीची रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी. सण व उत्सवाच्या काळात राज्य शासनामार्फत देण्यात येणारा 'आनंदाचा शिधा' या शिधा जिन्नस संचांच्या विक्रीकरिता प्रति सिधा जिन्नस संच १५ रुपये इतके मार्जिन देण्यात यावे. राज्यामध्ये प्रचलित "गाव तिथे दुकान" धोरणानुसार एक हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावातील दुकानदाराला एक हजार लोकसंख्येएवढेच मार्जिन देण्यात यावे. राज्यातील सर्व रास्त भाव दुकानांना वाणिज्य ऐवजी घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांसाठी संप पुकारला जाणार आहे. गडचिरोली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार चंदू प्रधान यांनी निवेदन स्वीकारले. निवदेन देताना बी. यू, नैताम, बाळा नैताम, सरिता टेंभूर्णे, अनिल भांडेकर, मोहन पाल, काशीनाथ जेंगठे उपस्थित होते. 

खर्चासाठी पैसे द्यास्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता करामध्ये सवलत मिळावी. रास्त भाव दुकानाचे भाडे वीज बिल, इंटरनेट खर्च, स्टेशनरी खर्च तसेच मापाडी पगार यासारख्या इतर अनुषंगिक बाबींसाठी ग्रामीण व शहरी भागाकरिता अनुक्रमे प्रति रास्त भाव दुकान प्रति महिना किमान तीन ते सात हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी आहे

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली