चामोर्शी, मुलचेरात २७ उमेदवार : गण्यारपवारांच्या नेतृत्वात निवडणूक लढणार चामोर्शी : राष्ट्रीय समाज पक्ष पुरस्कृत जनसेवा विकास मंच चामोर्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ७ तर पंचायत समितीच्या १८ पैकी १४ जागा तर मुलचेरा तालुक्यात जि. प. च्या २ व पंचायत समितीच्या ४ जागा लढणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम व नियोजन सभापती तथा जनसेवा मंचाचे नेते अतुल गण्यारपवार यांनी दिली आहे. त्यांनी चामोर्शी येथे पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा बुधवारी केली. जिल्हा परिषदेसाठी चामोर्शी तालुक्यातील विसापूर-कुरूड क्षेत्रातून जया गणेश शिताळे, विक्रमपूर-फराडा ममता श्रीकृष्ण आभारे, भेंडाळा-मुरखळा कुंदा नरेंद्र जुआरे, लखमापूर बोरी-गणपूर रै. अतुल गंगाधर गण्यारपवार, हळदवाही-रेगडी सुधाकर भिका पोटावी, घोट-सुभाषग्राम अशोक नारायण पोरेड्डीवार, दुर्गापूर-वायगाव कल्पना अरूण बंडावार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मुलचेरा तालुक्यातील कोठारी-शांतीग्राम क्षेत्रातून पल्लवी जानकीराम कुसनाके, कालीनगर-विवेकानंदनगरपूर क्षेत्रातून बादल महादेव शहा यांना जि. प. ची उमेदवारी देण्यात आली आहे, अशी माहिती गण्यारपवार यांनी दिली. तर चामोर्शी तालुक्यातील विसापूर पं. स. गणातून वीणा भावेश किरंगे, कुरूळ विद्या रवींद्र बोदलकर, विक्रमपूर अनिल जगदीश अधिकारी, फराडामधून दुसीला जगदीश सरकार, भेंडाळामधून द्वारका कैलास गायकवाड, मुरखळामधून भाग्यश्री मधुकर चिंतलवार, लखमापूर बोरीमधून प्रवीण रूपचंद बांबोळे, गणपूरमधून माधव जगन्नाथ परसोडे, हळदवाहीमधून अंतकला वामन मडावी, रेगडीमधून शामली विवेकानंद देवळी, घोटमधून पवन हास्यवदन दुधबावरे, सुभाषग्राममधून रंजीता परिमल रॉय, दुर्गापूरमधून रेखा आनंदराव पिदुरकर, वायगावमधून राजू वासुदेव आत्राम, मुलचेरा तालुक्यातून पंचायत समितीकरिता कोठारीमधून मंगला आनंदराव कुमरे, शांतीग्राममधून बिंदूसार वासुदेव रामटेके, कालीनगरमधून नीलम नागोराव उराडे आणि विवेकानंदपूरमधून लता विजय बोधनवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला गडचिरोली नगर पालिकेचे माजी सभापती विजय गोरडवार, रासपचे जिल्हाध्यक्ष उराडे, जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी, प्रतिभा गद्देवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष परमानंद मलीक, संचालक विनायक आभारे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास चुधरी, संचालक श्यामराव पोरेटी, गडचिरोलीच्या माजी नगरसेवक संध्या उईके, मिनल चिमुरकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
रासप, जनसेवा मंचाचे उमेदवार जाहीर
By admin | Updated: February 2, 2017 01:23 IST