लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षांचा सश्रम कारवास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.तौशिफ हबीब शेख रा. जवाहर वॉर्ड, देसाईगंज असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तौशिफ शेख हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घरासमोर पानठेला चालवित होता. १ जानेवारी २०१५ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेख याने वेगवेगळ्या ठिकाणी मुलीच्या मर्जीविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलगी ही गर्भवती झाली. त्यानंतर आरोपी शेख याने सदर मुलीला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडले. सदर प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यास जीवानिशी ठार मारण्याची धमकी आरोपी शेख याने संबंधित पीडित मुलीला दिली. याबाबतची तक्रार अल्पवयीन मुलीने देसाईगंजच्या पोलीस ठाण्यात दाखल केली.या तक्रारीवरून आरोपी शेख याच्याविरोधात भादंविचे कलम ३७६, ३१३ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी शेख याला १७ फेब्रुवारी २०१६ रोजी पोलिसांनी अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर देसाईगंज पोलिसांनी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे साक्षदारांचे बयाण नोंदवून तसेच सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायाधीश यू.एम. पदवाड यांनी आरोपी शेख याला १० वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल प्रधान यांनी काम पाहिले.
बलात्कार करणाऱ्या आरोपीला कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:01 IST
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षांचा सश्रम कारवास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
बलात्कार करणाऱ्या आरोपीला कारावास
ठळक मुद्देन्यायालयाचा निकाल : अल्पवयीन मुलीवर अत्याचार