शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीव प्रगणनेत आढळल्या दुर्मीळ रानम्हशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:53 IST

वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.

ठळक मुद्देकोलामार्का संवर्धन क्षेत्र : रानम्हशींची संख्या २८ च्या वर असल्याचा वन विभागाचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : वन विभागाने वन्यजीव प्रगणनेला २० जानेवारीपासून सुरूवात केली आहे. यादरम्यान कमलापूर वन परिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४ ला लागून असलेल्या इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन झाले आहे.कमलापूर वन परिक्षेत्रातील १४० वर्ग किलोमीटरच्या परिसरात रानम्हशींच्या संवर्धनासाठी सन २०१२ मध्ये कोलामार्का संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी याठिकाणी केवळ १२ रानम्हशी होत्या. या म्हशी दुर्मीळ असल्याने त्यांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने वन विभागाने विविध उपाययोजना केल्या. या म्हशींची शिकार होणार नाही. यासाठी खबरदारी घेतली. जंगलामध्ये छोटे-मोठे पाणवटे, खोदतळे तयार करून त्यांना पाण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या परिसरात रानम्हशींची संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात सद्यस्थितीत २८ च्या वर रानम्हशींचे अस्तित्त्व असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे या ठिकाणीसुद्धा या म्हशींचे आवागमन सुरू राहते. कमलापूर परिसरात घनदाट जंगल आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गवत उपलब्ध असल्याने रानम्हशींच्या आरोग्यासाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. ही बाब लक्षात घेऊनच रानम्हशी संवर्धन क्षेत्र म्हणून या परिसराला घोषित करण्यात आले आहे. कोलामार्का संवर्धन क्षेत्रात रानम्हशींसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी रानम्हशींचे अस्तित्त्व वाढले आहे. त्यांची संख्या आणखी वाढण्यासाठी वन विभाग आवश्यक ते प्रयत्न करेल, अशी माहिती सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी दिली आहे.