लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारू पूर्णत: बंद करण्याची मागणी घेऊन आठ गावातील संतप्त महिला शुक्रवारी गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकल्या.देलोडा (बुज), इंजेवारी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी या गावांतील शेकडो महिलांनी गडचिरोली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांना निवेदन सादर करण्यात आले . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलांशी सकारात्मक चर्चा करून दारूबंदी करण्याचे आश्वासन दिले.देलोडा (बुज), इंजेवारी, पेठतुकूम, देऊळगाव, आकापूर, डोंगरसावंगी, चुरमुरा, किटाळी या गावांत सुरु असलेली अवैध दारू बंद करण्यासाठी गाव संघटना तयार केली आहे. गावातील अवैध दारू विक्री बंद केली आहे. परंतु गावाच्या बाजुच्या सूर्यडोंगरी या गावात अवैध दारूविक्री सुरु आहे. तसेच सूर्यडोंगरी शेजारील संपूर्ण जंगल परिसरात दारू काढण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे आमच्या गावातील लोक तेथे जाऊन दारू पिऊन येतात च गावामध्ये भांडण, तंटे करतात. तसेच महिलांना नको त्या शब्दात बोलतात. त्यामुळे आम्ही आमच्या गावात केलेली दारूबंदी अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे इंजेवरी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, किटाळी, आकापूर, चुरमुरा, डेलोडा बुज या गावांमध्ये गाव संघटनेमार्फत दारूविक्री बंद करण्यात आली आहे. मात्र सूर्यडोंगरीमध्ये ८० टक्के लोक दारूविक्री व्यवसाय करीत असल्यामुळे लगतच्या सर्व गावांना त्याचा त्रास होत आहे.यापूर्वी पोलीस स्टेशन आरमोरी येथे याबाबत दोनदा लेखी तक्रार देण्यात आली होती. तसेच पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात आली होती. तरी सुद्धा पोलिसांना न जुमानता दारूविक्रेत्यांनी आपले धंदे तसेच सुरु ठेवले आहे. तेव्हा सूर्यडोंगरी गावाची दारूविक्री बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी देलोडा बुज, इंजेवरी, पेठतुकूम, देऊळगाव, डोंगरसावंगी, किटाळी, आकापूर, चुरमुरा या गावांतील महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी महिलांना दारूबंदीसाठी मार्गदर्शन करून सूर्यडोंगरी येथील दारू विक्री बंद करण्याची अश्वासन दिले.अनेक गावातील महिला झाल्या आक्रमकमुक्तिपथ व दारूबंदी गाव संघटनेमार्फत अवैध दारूविक्रीविरोधात गावागावात जनजागृती सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली व आरमोरी तालुक्यातील अनेक गावातील महिला दारूबंदीच्या मुद्यावर आता आक्रमक झाले आहेत. या महिलांना तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व काही ग्रा.पं.पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
रणरागिणींची एसडीपीओ कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:17 IST
आरमोरी तालुक्यातील सूर्यडोंगरी येथे पोलिसांना न जुमानता जोमाने दारू विक्री व्यवसाय सुरु असून याचा त्रास शेजारील दारूबंदी असलेल्या गावांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सूर्यडोंगरी गावातील दारू पूर्णत: बंद करण्याची मागणी घेऊन आठ गावातील संतप्त महिला शुक्रवारी गडचिरोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडकल्या.
रणरागिणींची एसडीपीओ कार्यालयावर धडक
ठळक मुद्देसूर्यडोंगरीतील दारू बंद करा : आठ गावातील महिलांची एकमुखी मागणी; बंद करण्याचे आश्वासन मिळाले