शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राकाॅंच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाठविले गोवऱ्यांचे पार्सल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 05:00 IST

महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला, असे म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढून सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेणाच्या गोवऱ्यांचे पार्सल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पोस्टाने पाठविले. याशिवाय आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी शुभम गुप्ता यांना निवेदनही सादर केले.महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्हा चुलीकडे चला, असे म्हणण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य माणूस आर्थिक, शारीरिक व मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी गॅस, पेट्रोल,  डिझेलची सातत्याने दरवाढ करून केंद्र सरकार सर्वसामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे त्या म्हणाल्या.या आंदोलनात एटापल्ली तालुका महिला अध्यक्ष ललिता मडावी, शहर उपाध्यक्ष सरिता गावडे, युवती तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बेबीताई लेकामी, जिल्हा परिषद सदस्य ग्यानकुमारी कौशी, बेबी हेडो, नलिनी आतकमावार, सुषमा गड्डमवार, भावना गड्डमवार, अनिता कांबळे, सुनीता कांबळे, अक्षता पर्वतलवार, सुरेखा गड्डमवार आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

रक्षाबंधनाच्या ओवाळणीसाठी भावाला रिटर्न गिफ्टकाही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे भाव २५ रुपयांनी वाढवून देशातील आपल्या सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. वर्षभरात पंतप्रधान अधूनमधून आपल्या बहिणींना ही ओवाळणी महागाईच्या स्वरूपात देतच असतात. याच प्रेमाखातर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसमार्फत आपल्या प्रधानसेवकांना रक्षाबंधनाचं रिटर्न गिफ्ट म्हणून महागाईचे प्रतीक असलेल्या शेणाच्या गोवऱ्या पाठवल्या असल्याचे एटापल्ली शहर अध्यक्ष पौर्णिमा श्रीरामवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरNCPराष्ट्रवादी काँग्रेस