शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राकाँची वन विभागावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:41 IST

वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम तसेच....

ठळक मुद्देधर्मरावबाबा आत्राम यांचे नेतृत्व : वनपट्ट्यांचे वितरण करा

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : वने, महसुल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित समस्यांचे तत्काळ निराकरण करावे, या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात आलापल्ली येथील उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करणाºया नागरिकांना तत्काळ जमिनीचे पट्टे वाटप करावे, गैरआदिवासी शेतकºयांना वनजमिनीच्या पट्ट्यासाठी तीन पिढ्यांची अट रद्द करावी, वनविभागाची कामे करताना स्थानिक मजुरांना प्राधान्य द्यावे, मजुरांची थकीत मजुरी तत्काळ द्यावी, अगरबत्ती प्रकल्पात काम करणाºया महिलांना दरमहा सहा हजार रुपये मानधन द्यावे, वनविभागामार्फत करण्यात येणारी रोपवाटिका, थिनींग, लॉगिंग व अन्य कामे पूर्ववत सुरु करावी, सुरजागड लोहप्रकल्पाची विस्तृत माहिती द्यावी, सुरजागड पहाडावर करण्यात आलेल्या वृक्षतोडीची माहिती द्यावी, भामरागड, सिरोंचा व आलापल्ली वनविभागातील तेंदू मजुरांची बोनसची रक्कम तत्काळ अदा करावी, खसरा डेपोत जळाऊ लाकडे व बांबू उपलब्ध करुन द्यावे, वनकर्मचाºयांना वेतनवाढ द्यावी, तसेच रोजंदारी कर्मचाºयांना कायमस्वरुपी सेवेत समाविष्ट करावे इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपवनसंरक्षक तांबे यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, कैलास कोरेत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवींद्रबाबा आत्राम, सुकडू कोरेत, पंचायत समिती सदस्य प्रांजली शेंबळकर, आलापल्लीच्या उपसरपंच पुष्पा अलोणे, ग्रा.पं. सदस्य सतीश आत्राम, माजी सरपंच रेणुका कुळमेथे, अर्चना कोडापे, वासुदेव पेद्दीवार, स्वामी वेलादी, अल्ताफ पठाण, सत्यन्ना मेरगा, उमेश आत्राम, वशिल मोकाशी, प्रवीण तोटावार, रघु पांढरे, सोमेश्वर रामटेके, मुनेश्वर गुंडावार, संतोष गणपूरवार यांच्यासह अहेरी परिसरातील राष्टÑवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.