राजाराम खांदला : नागरी सेवा दिनाच्या अनुषंगाने उपपोलीस ठाणे राजाराम खांदला येथे शनिवारी प्रभारी अधिकारी सुदाम शिरसाट यांच्या नेतृत्त्वात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातील कर्मचारी बॅरेक, पोलीस ठाणे बॅरेक, सुरक्षा भिंतीपलीकडील परिसर आदींची स्वच्छता करून हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला. तसेच यापुढेही हा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नियमित कार्यक्रम राबविण्याचा निर्धार जाहीर केला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, गोपाळ लावणे, संदीप पाटील, खंळाडे, विटेकरी, जिल्हा पोलीस कर्मचारी, एसआरपी कर्मचारी आदी मोठ्या संख्येने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. नागरी सेवा दिवसाच्या अनुषंगाने पोलिसांनी राबविलेल्या या कार्यक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. (वार्ताहर)
राजाराम पोलिसांकडून स्वच्छता मोहीम
By admin | Updated: April 19, 2015 01:35 IST