शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने प्राणहितेचा जलस्तर वाढला

By admin | Updated: June 17, 2017 01:57 IST

गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या

वाहतूक बंद : पूल बांधकामावर परिणाम; पावसाळ्यात तेलंगणा-महाराष्ट्राचा संपर्क तुटणार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून विदर्भात मृगनक्षत्राचा पाऊस कुठेना कुठे पडत आहे. तसेच गुरूवारी दुपारच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातही पाऊस झाला. पावसामुळे अहेरी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीचा जलस्तर अचानक वाढला. दरम्यान कच्च्या रस्त्याने सुरू असलेली वाहतूक दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक बंद झाली. जलस्तर वाढल्यामुळे प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामावर परिणाम होणार आहे. पावसाळ्यात आणखी प्राणहिता नदीचा जलस्तर वाढून सदर मार्ग बंद होणार असल्याने महाराष्ट्र व तेलंगणाचा संपर्क तुटणार आहे. गुरूवारी दुपारच्या सुमारास पाऊस झाल्याने अहेरीनजीकच्या प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान पूल बांधकामासाठी वाहनेही नदीपात्रात होती. पायदळ तसेच दुचाकीने लोकांचे येथील कच्च्या मार्गावरून आवागमन सुरू होते. मात्र पावसाने अचानक जलस्तर वाढल्याने पूल बांधकामावरील सर्व वाहने महाराष्ट्राच्या सीमेकडे ठेवण्यात आली. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अर्ध्यापेक्षा अधिक पाण्याखाली आला आहे. पाण्याचा प्रवाह या नदीपात्रात वाढला आहे. अचानक प्राणहिता नदीचा जलस्तर वाढल्याने पूल बांधकामात अडचण निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्राच्या सीमेकडील पिलर उभारण्याचे बांधकाम सुरू आहे. जलस्तर वाढल्याने तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील वाहतूक थांबली आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यास प्राणहिता नदीचा जलस्तर प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. परिणामी दोन्ही राज्याचा संपर्क तुटणार असून नावेच्या साह्याने लोकांना प्रवास करावा लागणार आहे. प्रसंगावधान राखल्याने युवक बचावला अहेरी शहरातील एक युवक तेलंगणा राज्याच्या गुड्डेमकडून अहेरीकडे परत येत होता. गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने प्राणहिता नदीचा जलस्तर वाढला. दरम्यान सदर युवकाचा नदीपात्रात तोल गेल्याने अर्ध्या किमीपर्यंत तो वाहत गेला. मात्र त्याने वेळीच प्रसंगावधान दाखवून नदीपात्रातील एका झाडास पकडले. त्यामुळे त्याचा जीव वाचला. सदर युवकाला छोट्या नावेने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे या घटनेचा काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले असल्याची माहिती आहे. या नदीपात्राच्या परिसरात पावसाळ्यात विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.