शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

दक्षिण भागात पावसाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उचलण्यात आले आहेत. पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

ठळक मुद्देप्राणहिता व गाेदावरी नद्यांचे पाणी शिरले शेतात; कापूस, साेयाबिन, धानाचे नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा तडाखा ाजिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यांना बसला आहे. सिराेचा तालुक्यात प्राणहिता व गाेदावरी नदीच्या पुराने थैमान घातले आहे, तर एटापल्ली, भामरागड, चामाेर्शी तालुक्यांतील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीवरी गाेसेखुर्द धरणाच्या ३३ गेटपैकी १९ गेट अर्धा मीटरने उचलण्यात आले आहेत. धरणातून २ हजार २५० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चिचडाेह बॅरेजचे सर्वच ३८ गेट उचलण्यात आले आहेत. पवनी, देसाईगंज, वाघोली व आष्टी सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. महागाव व टेकरा सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदी इशारा पातळीच्या खाली आहे.  मेडीगड्डा बॅरेजचे ८५ पैकी ७९ गेट उघडलेले असून, २६ हजार ३२० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.  भामरागड सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार पाणीपातळी पर्लकाेटा पुलाच्या २.२० मीटरने खाली आहे.

झाड काेसळल्याने वाहतूक ठप्पचामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा- सगणपूर मार्गावर डॉ. मंडल यांच्या शेताजवळील झाड पावसामुळे कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली हाेती. नागरिकांनी झाडाच्या फांद्या ताेडून रस्ता माेकळा केला.

गाेविंदपूर नाल्यावरील वाहतूक पुन्हा थांबलीगडचिराेली-चामाेर्शी या मुख्य मार्गावरील गाेविंदपूरजवळ असलेल्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. बाजुने बनविलेल्या कच्च्या रस्त्यावरील तात्पुरता पूल पाण्याखाली आल्याने या मार्गावरची वाहतूक शनिवारी थांबविली हाेती.

सिराेंचा तालुक्याला पुराचा तडाखा

- सिराेंचा : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सिराेंचा तालुक्यातून वाहणाऱ्या गाेदावरी व प्राणहिता या दाेन्ही नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी सखल भागात असलेल्या शेतीत शिरल्याने साेयाबीन, कापूस, मिरची व धान पिकाचे माेठे नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. - सिराेंचा तालुक्यातील  रेगुंठा, बामणी, रंगय्यापल्ली, अमरावती, कार्सपल्ली, सिरोंचा, नगरम, चिंतालपल्ली, आरडा, जानमपल्ली ही गावे प्राणहिता नदीच्या काठावर वसली आहेत. प्राणहिता नदीचे पाणी सखल भागात असलेल्या शेतांमध्ये शिरले आहे. त्यामुळे पीक नष्ट हाेण्याचा धाेका निर्माण झाला आहे. 

अंकिसा : येथून ८ की.मी. अंतरावर असलेले सोमनपल्ली नाल्याच्या पुलावरून मागील चार दिवसांपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे पातागुडम, कोपेला, कोरला व रायगुडम इत्यादी गावांचा संपर्क तुटला आहे.  जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आहे. साेमनपल्ली नाल्यामुळे पावसाळ्यात पलीकडच्या गावांचा अनेक वेळा संपर्क तुटत असल्याने उंच पूल बांधण्याची मागणी हाेत आहे. मेडीगड्डा बॅरेजचे दरवाजे उघडल्याने गाेदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. माेटला टेकडा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर