शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.

ठळक मुद्देउभा धान पडला आडवा : अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांचे नुकसान

न्यूज नेटवर्कगुड्डीगुडम/अहेरी : गेल्या पाच-सहा दिवसांपासून अहेरी उपविभागासह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसामुळे गुड्डीगुडम भागातील मोसम व लगतच्या शेत जमिनीतील हलक्या प्रतिच्या धान पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हलक्या प्रतिचा उभा धान आडवा पडल्याने जमिनदोस्त झाला आहे.अहेरी उपविभागात धान हे प्रमुख पीक घेतले जाते. या भागात आदिवासी व बिगर आदिवासी समाजबांधव राहतात. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. यंदाच्या खरीप हंगामात या भागातील शेतकऱ्यांनी हलके, मध्यम व जड या तिन्ही प्रतिच्या धानाची लागवड केली. सुरूवातीला पाऊस लांबला. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतली नाही. दरम्यान शेतकरी संकटात सापडला होता. कशीबशी पेरणी करून शेतकºयांनी रोवणी आटोपली.हलक्या प्रतिचा धान पीक दिवाळीपूर्वी भरला. दिवाळीनंतर या धान पिकाची कापणी व बांधणीचे काम होणार होते. काही शेतकºयांनी तशी कापणी केली आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वी पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरासह अहेरी उपविभागात दमदार अवकाळी पाऊस बरसला. परिणामी हलक्या प्रतिचा धान पीक आडवा पडल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. परिणामी अहेरी उपविभागातील शेतकरी संकटात सापडले आहेत. सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाला पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :agricultureशेती