शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा हलक्या धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलके धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना मागील आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने हलक्या धानाचे प्रचंड नुकसान होत आहे. जड व मध्यम धानासाठी मात्र सदर पाऊस नवसंजीवनी ठरत आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलके धानपीक सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कापणी योग्य ...

ठळक मुद्देधान कापलेल्या बांधित साचले पाणी : वादळामुळे धान पडून नुकसान; उत्पादनात घटीचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलके धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना मागील आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने हलक्या धानाचे प्रचंड नुकसान होत आहे. जड व मध्यम धानासाठी मात्र सदर पाऊस नवसंजीवनी ठरत आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलके धानपीक सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कापणी योग्य होते. जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टरवर हलक्या धानाची लागवड करण्यात आली आहे. धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना पावसाचा जोर वाढला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने काही शेतकºयांनी धानाची कापणी लांबणीवर टाकली आहे. तर ज्या शेतकºयांनी धानपीक कापले आहे, त्या शेतात पाणी जमा झाल्याने धानाच्या कडपा ओल्या होत आहेत. काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास बांधीमध्येच धान खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ऐन कापणीच्या हंगामात धानपीक हातातून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, असे गरीब शेतकरीच हलक्या धानाची लागवड करतात. मात्र धानाच्या नासाडीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.काही भागात वादळवाºयासह पाऊस होत आहे. याचा फटका जड व हलक्या धानालाही बसत आहे. पाऊस तसेच वादळामुळे अनेक ठिकाणचे धानपीक पडत आहे. निसवण्याअगोदरच धानपीक पडल्यास उत्पादनात कमालीची घट होते. त्याचबरोबर पडलेले धान कापतानाही अडचण निर्माण होते.काही शेतकरी सोयाबिन, तीळ पिकाची लागवड करतात. सोयाबिन पकही कापणीला आले आहे. अशातच पाऊस येत असल्याने सोयाबिन पिकाचीही कापणी लांबली आहे. अवकाळी पावसाचा फटका सोयाबिन पिकाला सुद्धा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.जड धानासाठी संजीवनीतलाव व बोड्या आटल्या आहेत. त्यामुळे जडधानाला पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच अधूनमधून पाऊस येत असल्याने जडधानासाठी नवसंजीवनी ठरली आहे. त्याचबरोबर सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकºयांचा पाणी देण्याचाही खर्च अवकाळी पावसामुळे कमी झाला आहे. परिणामी अवकाळी पावसाचे जड धान उत्पादक शेतकºयांकडून स्वागत होत आहे. जडधान सध्या गर्भात असून नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यात या धानाच्या कापणीला सुरुवात होणार आहे.