शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा मिरचीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला ...

ठळक मुद्देदरावर होणार परिणाम : सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मिरची, कापूस, ज्वारी, मका यासह भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना जोरदार फटका बसला. तोडणी करून वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची पावसात भिजल्याने मिरची काळवंडल्याने दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, बालमुत्यमपल्ली, आसरअल्लीसह परिसरात अनेक शेतकरी मिरची पिकाची लागवड करतात. या परिसरातून नदी वाहत असल्याने अनेक शेतकºयांनी आपल्या शेतात बोअरवेल खोदून त्या माध्यमातून शेतीला पाणी देतात. सध्या या भागात मिरची, कापूस, ज्वारी, मका आदी पिके उभी आहेत. यापैकी अनेक शेतकºयांनी मिरचीची तोडणी करून ती वाळू घातलेली आहे. मिरची तीन ते चार टप्प्यात तोडली जाते. सध्या मिरची तोडणीचा दुसरा व तिसरा टप्पा सुरू आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास पाऊस झाल्याने वाळविण्यासाठी ठेवलेली मिरची भिजली. काही शेतकºयांना पावसाची चाहूल लागताच त्यांनी मिरचीचे ढीग तयार केले. तरीसुद्धा पावसात मिरची भिजली. त्यामुळे मिरचीला बुरशी चढून ती काळवंडण्याची शक्यता आहे.एकदा जर मिरची काळवंडली तर तिला अत्यल्प दर मिळतो. परिणामी शेतकºयांचे नुकसान होणार आहे. याशिवाय या भागात कापसाची अंतिम तोडणीही झालेली नाही. पावसाने कापूस भिजून त्यालाही अत्यल्प दर मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकºयांनी उन्हाळी धानाची लागवड केली असल्याने काही प्रमाणात या अवकाळी पावसाचा फायदा या पिकाला झाला आहे.

टॅग्स :Rainपाऊस