शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकांनाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:38 IST

सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे.

ठळक मुद्देलागवडीचे क्षेत्र घटणार : अनेक शेतकऱ्यांनी पेरणी थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सप्टेबर महिन्यापासून पावसाने उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. त्यामुळे रबी पिकांची पेरणी करूनही पीक हाती येणार नाही, याची शाश्वती शेतकऱ्यांना झाली असल्याने काही शेतकऱ्यांनी रबी पिकांची पेरणी थांबविली आहे. त्यामुळे यावर्षी रबी पिकांचे क्षेत्र घटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गडचिरोली जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण २८ हजार ४०० हेक्टर क्षेत्र आहे. मागील वर्षी २२ हजार हेक्टरवर रबी पिकांची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी धानपीक निघल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत रबी पिकांची लागवड करतात. यासाठी मात्र जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यापासून उसंत घेतल्याने जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. त्यामुळे पिकाची पेरणी करणे शक्य नाही. जवळपासचे नदी, नाल्यांच्या पाण्याची पातळी सुध्दा मागील वर्षीच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे सिंचन करणेही शक्य नसल्याचे दिसून येते.रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा, लाखोळी, मुग, उडीद, बरबटी, कुरता, पोपट, जवस, भूईमूग, गहू, मका या पिकांची लागवड केली जाते. रबी पिकांचे उत्पादन कमी असले तरी या पिकांच्या लागवडीचा खर्च सुध्दा कमी आहे. त्यामुळे त्याचबरोबर धानपीक निघल्यानंतर शेती पडीक राहण्याऐवजी या पिकांची लागवड केली जाते. पूर्वी ज्वारी, जवस या पिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र या पिकांचे उत्पादन अतिशय कमी होत असल्याने शेतकरी आता मका पिकाकडे वळला आहे. मका पिकाला गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण व जमीन योग्य आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाला पसंती देत असून दरवर्षी या पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागील वर्षी सुमारे तीन हजार हेक्टरवर मक्याची लागवड केली होती. यावर्षी मक्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.कडधान्याचे क्षेत्र घटलेकडधान्यामध्ये मूग, उडीद, बरबटी, कुरता, चवळी, वाल, पोपट यांचा समावेश होतो. मात्र शेतकरी या पिकांकडे पाठ फिरवित इतर नगदी पिकांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. मूग, उडीदाचे उत्पादन होणाऱ्या जमिनीत आता सोयाबिन, कापूस या पिकांची लागवड केली जात आहे. कापूस पीक जवळपास मार्चपर्यंत राहत असल्याने रबी पिकांची लागवड करणे शक्य होत नाही.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती