शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण वाढविण्याचा प्रश्न थंडबस्त्यात

By admin | Updated: October 29, 2015 01:56 IST

जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींचे गडचिरोली जिल्ह्यातील नोकर भरतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे.

भाजप सरकारचे दुर्लक्ष : पेसा अधिसूचनेमुळेही ओबीसी अडचणीतगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून सहा टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसींचे गडचिरोली जिल्ह्यातील नोकर भरतीचे दरवाजे कायमचे बंद झाले आहे. ओबीसी आरक्षण वाढवावे, ही मागणी गेल्या १५ ते २० वर्षांपासून विविध ओबीसी संघटनांकडून करण्यात येत आहे. राज्यात आघाडी सरकार सत्तारूढ असताना भारतीय जनता पक्षाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून रान उठविले होते. सरकार या प्रश्नावर दुर्लक्ष करीत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात पेसा अधिसूचनेत राज्यपालांकडून सुधारणा घडवून आणू, असे आश्वासन भाजप नेत्यांनी मतदारांना जाहीररित्या दिले होते. युती सरकारच्या काळात ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले. हा काँग्रेसचा आरोप आहे. राज्यात व केंद्रात भाजप सरकार विराजमान होऊन वर्षांचा कालावधी लोटत येत आहे. मात्र आता भाजपच्या अजेंड्यावरून ओबीसी आरक्षण वाढविण्याचा मुद्दा बाद झाला आहे. काँग्रेसने या प्रश्नावर ९ आॅगस्टपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत २८ दिवस उपोषण केले. बंद पाळला. या काळात भाजपचे लोकप्रतिनिधी ५० वर्ष आरक्षण बदलणार नाही, अशी भाषा बोलू लागल्याचे दिसून आले. पेसा अधिसूचनेत बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला विधेयक पारीत करून राज्यपालांकडून करून घेता येऊ शकतो. मात्र याही प्रश्नावर भाजपातील ओबीसी नेते आता गप्प होऊन आहेत. भाजपचा एकही लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे भाजपने आता जिल्ह्यातील ओबीसींना वाऱ्यावर सोडले आहे. शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीत उत्पन्न मर्यादा वाढविल्याचा दावा खोटा-ओबीसी कर्मचारी असोसिएशनव्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती उत्पन्न मर्यादा ४.५ लाखावरून ६ लाख करण्यासंबंधी शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याचा लाभ २०१५-१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे, अशी माहिती ४ आॅक्टोबर २०१५ रोजी राज्याचे सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुणे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात ७ आॅक्टोबरला ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव प्रा. शेषराव येलेकर यांनी सामाजिक न्याय विभागात मंत्रालयात चौकशी केली. असा कोणताही शासन निर्णय झाला नसल्याचे तेथून सांगण्यात आले आहे. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी दिलेली माहिती महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारी आहे, असे येलेकर यांनी म्हटले आहे. शासन निर्णय न झाल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी ओबीसी विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्कासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थी गोंधळात पडले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना २०१३ मध्ये याच मुद्यावर सभागृह बंद पाडले होते. परंतु आता सरकारने प्रश्नावर भूमिका बदलविल्याचे दिसून येत आहे, असे येलेकर यांनी म्हटले आहे.