शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

लोकबिरादरी प्रकल्पात शुध्द पेयजलाची सुविधा

By admin | Updated: March 19, 2017 02:00 IST

अ‍ॅटलास कापको (भारत) लिमिटेड या इटलीतील कंपनीद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात

जल शुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन : दररोज १० लाख लिटर पाणी होणार शुध्द भामरागड : अ‍ॅटलास कापको (भारत) लिमिटेड या इटलीतील कंपनीद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात १० लाख लिटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र पूर्णत्वास आणण्यात आले आहे. त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात येणारे रूग्ण, नातेवाईक तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना आता पिण्याचे शुध्दी पाणी मिळणार आहे. या जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन १५ मार्च रोजी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे व अ‍ॅटलास कापकोचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शालिनी शर्मा, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण, पाटील, डॉ. अनघा आमटे, डॉ. दिगंत आमटे, समिक्षा आमटे व अनिकेत आमटे आदी मान्यवर उपस्थित होते. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पात दररोज हजारो पर्यटक भेट देतात. प्रकल्पाच्या आश्रमशाळेत ६५० ते ७०० विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. प्रकल्पातील दवाखान्यात येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. प्रकल्पाचे कार्यकर्ते व कर्मचारी निवासी राहतात. या सर्वांना आता शुध्द पेयजल मिळणार आहे. वर्षभरापूर्वी अ‍ॅटलास कापको या कंपनीने पामुलगौतम नदीपासून लोकबिरादरी प्रकल्पापर्यंत तीन किमी अंतरावर पाईपलाईन टाकली. त्यानंतर प्रकल्पात जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती केली. बरेच आजार हे अशुध्द पाण्यातूनच होतात. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती करण्याचा निर्णय लोकबिरादरी प्रकल्पाने घेतला. मात्र यासाठी तांत्रिक मदत हवी होती. शर्थीचे प्रयत्न करून अ‍ॅटलास कापको कंपनीने लोकबिरादरी प्रकल्पात जलशुध्दीकरण केंद्र पूर्णत्वास आणले आहे. त्यामुळे आता सर्वांना शुध्द पेयजल मिळेल, असे मनोगत डॉ. प्रकाश आमटे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन जमीर शेख यांनी केले तर आभार जितेंद्र नाईक यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)